Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी 30 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स घसरले?

Stock Market Today: आज शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात किरकोळ वाढीसह झाली, मात्र काही वेळानंतर खरेदी वाढली. निफ्टी 26,200 च्या वर स्थिरावला, तर बँक निफ्टीत चांगली तेजी होती.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on
Updated on

Stock Market Today: आज शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात किरकोळ वाढीसह झाली. सुरुवातीच्या काही मिनिटांत बाजार थोडासा सुस्त दिसत होता, मात्र नंतर हळूहळू खरेदी वाढताना दिसली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे 161 अंकांनी वाढून 85,350 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टीही 56 अंकांच्या वाढीसह 26,200 च्या पातळीवर पोहोचला. बँक निफ्टीत तुलनेने जास्त उत्साह दिसून आला आणि तो जवळपास 200 अंकांनी वाढून 59,900 च्या वर व्यवहार करत होता.

मात्र सर्वच सेक्टरमध्ये तेजी नव्हती. FMCG निर्देशांक आजही घसरला आणि बाजार उघडताच तो सुमारे 1.2 टक्क्यांनी खाली गेला. FMCG सोबतच फार्मा आणि हेल्थकेअर शेअर्समध्येही विक्रीचा दबाव दिसून आला. याउलट ऑटो सेक्टरमध्ये जवळपास 1 टक्के वाढ झाली. मेटल, PSU बँका, रिअल्टी, NBFC तसेच ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये चांगली खरेदी झाली.

निफ्टी 50 मधील शेअर्समध्ये हिंदाल्को, एशियन पेंट्स, मारुती, जिओ फायनान्शियल, NTPC, BEL आणि कोल इंडिया या शेअर्समध्ये तेजी होती. दुसरीकडे ITC शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ITC मध्ये सुमारे 3.7 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय डॉ. रेड्डीज, टायटन, बजाज ऑटो, टाटा कंझ्युमर, HCL टेक, अपोलो हॉस्पिटल्स आणि नेस्ले हे शेअर्सही घसरले.

काय आहेत जागतिक संकेत?

जागतिक बाजारांकडून सध्या संमिश्र संकेत मिळत आहेत. नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे बहुतांश आंतरराष्ट्रीय बाजार बंद होते. आजही चीन, जपान, थायलंड आणि रशिया या देशांचे बाजार बंद असल्याने आशियाई बाजारांकडून फारसा आधार मिळण्याची शक्यता नाही. मात्र GIFT निफ्टी सुमारे 25 अंकांनी वाढून 26,300 च्या आसपास व्यवहार करत होता. डाऊ फ्युचर्समध्येही जवळपास 100 अंकांची वाढ दिसून आली.

FIIची विक्री सुरूच, देशांतर्गत गुंतवणूकदारांची खरेदी

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सलग आठव्या दिवशी विक्री करत सुमारे 3,300 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून एकूण विक्री सुमारे 3,500 कोटी रुपयांची झाली. मात्र देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 87 व्या दिवशीही खरेदी सुरू ठेवत सुमारे 1,526 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ज्यामुळे बाजाराला काहीसा आधार मिळाला.

Stock Market Today
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला भावनिक पत्र; 'आम्ही तुमच्याबद्दल...'

ITC, ऑटो आणि कॉर्पोरेट घडामोडी

सिगारेटवरील एक्साइज ड्युटीची घोषणा झाल्यानंतर ITC शेअरवर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. काही ब्रोकरेज कंपन्यांनी स्टॉकचे रेटिंग कमी केल्याने गुंतवणूकदार सावध आहेत.

ऑटो सेक्टरमधून मात्र सकारात्मक बातम्या येत आहेत. 2025 हे वर्ष मारुतीसाठी चांगले ठरले आहे. डिसेंबरमध्ये हिरो मोटोकॉर्पच्या विक्रीत 40 टक्क्यांची वाढ झाली, तर TVS मोटरच्या एकूण विक्रीत जवळपास 50 टक्क्यांची वाढ झाली. ह्युंदाईच्या विक्रीतही 6 ते 7 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Stock Market Today
Cigarette Tax Shock: सिगरेटवर नवा कर लागू होताच शेअर बाजार हादरला; कंपनीला काही मिनिटांत 50,000 कोटी रुपयांचा फटका

दरम्यान, KFC आणि पिझ्झा हट चालवणाऱ्या देवयानी इंटरनॅशनल आणि सॅफायर फूड्स यांच्या मर्जरची घोषणा झाली आहे. या करारानुसार सॅफायर फूड्सच्या 100 शेअर्समागे देवयानीचे 177 शेअर्स मिळणार आहेत. या घडामोडीमुळे दोन्ही शेअर्समध्ये आज मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news