Crime News: नुकत्याच पोलीसांच्या अटकेत आलेल्या फिडिओथेरपिस्टची कहानी ही लोभीपणा, खोटी ओळख अन् सायबर क्राईमची एक खतरनाक भेळ आहे. भूरा खुर्दचा निवासी असलेल्या शराफत अलीचा मुलगा आसिफ अली हा स्वतःला शिकला सवरलेला फिजिओथेरपिस्ट म्हणवून घेत होता. मात्र आता हा शराफतचा मुलगा पोलिसांच्या अटकेत आहे. त्याला अटक झाल्यापासून त्याच्या खऱ्या आयुष्याचे एक एक पदर उलगडत आहेत.
पोलिसांच्या तपासात आसिफने धक्कादायक खुलासे केले आहेत. तो गेल्या एका महिन्यात विदेशी अॅप्सवरून ५६ देशांच्या लोकांसोबत ऑनलाईन सेक्सुअल औषधे आणि लैंगिक क्रियांचे ट्रेनिंग घेत होता. एवढंच नाही तर या सेशनचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करत होता. पोलिसांनी आसिफच्या मोबाईल फोनमधून मोठ्या संख्येने अश्लील व्हिडिओ जप्त केले आहेत. त्याच्या सोबत या नेटवर्कमध्ये अजून कोण कोण सामील आहे. याचा तपास आता सुरू झाला आहे.
पोलीस अधीक्षक सुमित शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की आसिफ स्वतःला फिजिओथेरपिस्ट सांगून मुतखड्यापासून अनेक आजारांचे ऑपरेशन करत असल्याचा दावा करत होता. त्याने तपासात एका महिन्यात चार ऑपरेशन केल्याचे रूग्णांना सांगितले होते. मात्र त्याच्याकडे अशी शस्त्रक्रिया करण्याची वैद्यकीय परवानगी नाहीये. त्याने अशा शस्त्रक्रियांचे कोणतेही ट्रेनिंग घेतलेले नाही.
आसिफने झारखंडच्या कॅपिटल विद्यापीठातून डिग्री घेतली होती. त्यानंतर त्याने गावात खासगी फिजिओथेरपीचे क्लिनिक उघडले होते. यादरम्यान, आसिफची त्याच्या गावातील तीन युवतींशी ओळख झाली. उपचारादरम्यान बोलण्या बोलण्यातून मैत्री आणि त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. तो तीन तीन गर्लफ्रेंड एकाचवेळी सांभाळू लागला. इथंच त्याची तारेवरची कसरत झाली अन आयुष्याचा बॅलेन्सच बिघडला.
महागडे शौक, फिरणे आणि वाढता खर्च यामुळे त्याला पैसा अपुरा पडू लागला. पैशाची तंगी भरून काढण्यासाठी त्याने सहारनपूरमधील आपला मित्र सचिनच्या साथीने अवैध मार्ग निवडवला. त्याने दोन सरकारी रूग्णालयांना टार्गेटवर घेतल आणि ८ डिसेंबर रोजी रात्री त्याने सार्वजनिक स्वास्थ केंद्रात चोरी केली. त्याने तिथून नेब्युलाईजर मशीन, एलईडी टीव्ही. मीटर सह एकूण २४ महागड्या मेडिकल वस्तू चोरल्या.
पुढच्या दिवशी रूग्णालय प्रशासनानं पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तापस सुरू केला अन् सर्वात आधी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेश तपासले. या तपासात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस आसिफ अन् सचिनपर्यंत पोहचले. त्यांच्याकडून चोरी केलेले सामान हस्तगत करण्यात आले. तसेच गाडी अन् मोबाईल देखील जप्त करण्यात आला.