प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
राष्ट्रीय

India Pakistan Conflict : 'भूकेकंगाल' पाकिस्तानचे डोळे उघडणार तर कधी? वाचा 'संभाव्‍य' आर्थिक नुकसानीची आकडेवारी

भारताविरोधातील संघर्ष वाढविल्‍यास पाकिस्‍तानची अर्थव्‍यवस्‍था होणार उद्‍ध्‍वस्‍त

पुढारी वृत्तसेवा

India Pakistan Conflict : "युद्धाचे आर्थिक परिणाम केवळ जीवित किंवा मालमत्तेची हानी एवढ्या पुरतेच मर्यादित असत नाहीत. कोणत्‍याही देशासाठी युद्ध हे दीर्घकालीन संरचनात्मक असंतुलन निर्माण करते," २०व्या शतकातील सर्वात प्रभावशाली अर्थशास्त्रज्ञांपैकी एक जॉन मेनार्ड केन्‍स यांचे हे विचार कालातीत आहेत. कोणत्‍याही देशासाठी युद्ध हे केवळ मनुष्‍यबळाची हानीपुरतेच मर्यादित राहत नाही. त्‍याचे भीषण आर्थिक आणि सामाजिक परिणामही सर्वसामान्‍यांना भोगावे लागतात. मात्र अवघ्‍या तीन तासांमध्‍ये शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन करणार्‍या पाकिस्‍तानच्‍या राजकर्त्यांना याची जाणीव नसल्‍याचे पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाले आहे.

 युद्ध महिनाभर सुरु राहिले तर...

शनिवारी (१० मे) भारत पाकिस्‍तान शस्‍त्रसंधी करार झाला. मात्र अवघ्‍या तीन तासांमध्‍ये शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन करत भारतावर 'नापाक' हल्‍ले केले. यानंतर पाकिस्‍तानच्‍या पंतप्रधानांनी भारताविरोधात भाष्‍य केले. आता भारताविरोधातील संघर्ष वाढविल्‍यास पाकिस्‍तानची अर्थव्‍यवस्‍था होईल उद्‍ध्‍वस्‍त होणार आहे. एकीकडे आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीकडे भीक मागणार्‍या पाकिस्‍तानने भारताविरुद्ध एक महिना युद्ध सुरु ठेवले तर या संघर्षात पाकिस्‍तानचे होणारे संभाव्‍य आर्थिक नुकसानीचे आकडे धडकी भरविणारे आहेत. भारत-पाकिस्‍तान संघर्ष वाढला तर पाकिस्‍तानला पुढील चार आठवड्यात किती आर्थिक फटका बसेल यासंदर्भातील वृत्त पाकिस्‍तानमधील 'जिओ न्‍यूज'ने दिले आहे. जाणून घेवूया पाकिस्‍तानने एक महिना युद्ध केले तर होणार्‍या आर्थिक नुकसानीची आकडेवारी

पाकिस्‍तानला युद्धावर करावा लागणार खर्च...

  • 'जिओ न्‍यूज'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, पाकिस्‍तान हवाई दलास लढाऊ हवाई गस्तीच्‍या एअर पेट्रोलसाठी दररोज सुमारे २५ दशलक्ष (मिलियन) डॉलर खर्च येईल. चार आठवड्यांसाठी हा खर्च तब्‍बल १ अब्‍ज डॉलरवर जाईल.

  • ड्रोन ऑपरेशन्ससह राद व हात्फ-VII क्षेपणास्त्रे ऑपरेशन्सचा अतिरिक्त खर्च ४५० दशलक्ष डॉलर असेल.

  • सीमा सज्जता, सैन्य हलवणे, इंधन वापर, रडार, गुप्तचर प्रणाली इत्यादीसाठी दररोज सुमारे १५ दशलक्ष डॉलरचा चुराडा होईल.

सद्‍यस्‍थितीत पाकिस्‍तानची अर्थव्‍यवस्‍था

  • सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 25 अब्ज डॉलर

  • वित्तीय अस्थिरता व चलन अवमूल्यन :15 अब्ज डॉलर

  • व्यापार व पुरवठा साखळी तूट : 12 अब्ज डॉलर

  • थेटर परकीय गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्‍या निधीचे नुकसान : 5 अब्‍ज डॉलर

  • एकूण आर्थिक नुकसान : 57 अब्ज डॉलर

पाकिस्‍तानला आर्थिकदृष्‍ट्या उद्‍ध्‍वस्‍त कणारा संघर्ष

वरील आकडेवारीवरुन स्‍पष्‍ट होत की, पाकिस्‍तानने भारताबरोबर चार आठवड्यांसाठी जरी युद्ध केल्‍यास सुमारे ४५० दशलक्ष डॉलर्सचा चुराडा होईल. भारतीय चलनातून विचार केल्‍यास सुमारे 3,757.5 कोटी रुपये पाकिस्‍तानला मोजावे लागतील. त्‍यामुळेच भारताविरोधातील संघर्ष हा पाकिस्‍तानसाठी केवळ लष्‍करी नाही तर आर्थिकदृष्‍ट्यांही पूर्णत: उद्‍ध्‍वस्‍त करणारा आहे.

पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी

पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्‍तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्‍ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला. सलग दोन दिवस भारताने दिलेल्‍या तडाख्‍यानंतर पाकिस्‍तानचे कबंरड मोडलं. शनिवारी (१० मे) भारत पाकिस्‍तान शस्‍त्रसंधी करार झाला. मात्र अवघ्‍या तीन तासांमध्‍ये शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन करत आपले 'नापाक' हल्‍ले सुरु ठेवले. जम्‍मू-काश्‍मीरमध्ये अनेक ठिकाणी गोळीबार झाल्‍याचे घटना समोर आल्‍या आहेत. भारतानेही पाकिस्‍तानकडून हाेणार्‍या प्रत्‍येक हल्‍ल्‍यास सडेताेड प्रत्‍युत्तर देण्‍याचा निर्धार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT