Hyderabad Kalma Home Work Controversy pudhari
राष्ट्रीय

Hyderabad Kalma Home Work Controversy: दुसरीच्या वर्गातील मुलांना दिला 'कलमा' होमवर्क... पालकांनी विरोध करताच विषय तापला

Anirudha Sankpal

Hyderabad Kalma Home Work Controversy: हैदराबादमधील एका खासगी शाळेतील एका शिक्षिकेला दुसरीच्या वर्गातील मुलांना धार्मिक होमवर्क दिल्याप्रकरणी नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. ज्यावेळी एका हिंदू पालकांनी याबाबत तक्रार केली अन् एएनआयवर याबाबतचा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला आहे.

पालकांचा कडवा विरोध

सुप्रिया गौड या हिंदू पालकाने एएनआयशी बोलताना सांगितलं की, 'काल मी माझ्या भाच्याला शाळेतून आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी मी त्याची डायरी चेक केली त्यात जे काही लिहिले होते ते विषयाला धरून नव्हते. मी पाहिलं की शिक्षकांनी डायरीत कलमा आणि सुराह फतिहा हे वाचावे असे लिहिले होते. हे खूप चुकीचं आहे.'

शिक्षिकेची उचलबांगडी

पालकांनी त्यांच्या मुलांना कलमा आणि सुराह फतिहा मोठ्यानं म्हणण्यास सांगितलं जात होतं असा दावा केला आहे. यानंतर पालकांनी शाळेने या शिक्षिकेविरूद्ध कडक भूमिका घ्यावी अशी मागणी केली. त्यांनी मुलांना सुरह फतैहा आणि कलमा मोठ्याने म्हणायला सांगितलं होतं. ही सुचना योग्य नव्हती अशी भूमिका पालकांनी घेतली.

यानंतर शाळेने शेख आएशा परवीन यांना शाळेतून काढून टाकल्याचं पत्र दिलं. त्यात तुम्हाला सक्सेस ग्रुप एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये नोकरासाठी परत अर्ज करण्यास कायमचं अपात्र केलं आहे असं लिहिलं होतं.

भाजपचे शाळेसमोर आंदोलन

या घटनेनंतर भाजप नेत्यांनी शाळेच्या बाहेर आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी भाजप नेते अंदेला यादव , करूणासागर आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

अंदेला श्रीरामलू यादव यांनी 'शाळा कलमा कसं काय शिकवू शकते. या शिक्षणाचा काय उपयोग आहे. ही शाळा बंद करून टाका, मुख्याध्यापकांना काढून टाका, यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये लोकांची कलमा पढला नाही म्हणून हत्या करण्यात आली. अशा प्रकारे ते मुलांना शिकवतात का असं त्यांचं शिक्षण आहे का ते फक्त ५ ते ६ वर्षाची मुलं आहेत. या सर्वांची दुकाने बंद करा अन् जे कोण यात सामील आहेत त्या सर्वांना निलंबित करा.' अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT