Al Nino Heat Wave History: जगात १८७७ नंतरचा सर्वात शक्तीशाली अल नीनो तयार होत आहे. त्यावेळी संपूर्ण जगात उष्णतेची लाट आली होती. अनेक ठिकाणी दुष्काळ, महामारी पसरली होती. यात पृथ्वीवरील जवळपास ४ टक्के लोकसंख्या कमी झाली होती. आता शास्त्रज्ञांनी २०२६ - २७ मध्ये याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली आहे.
अल नीनो ही एक नैसिर्गिक हवामानासंदर्भातील घटना असते. यात पॅसिफिक महासागरातील उष्णकंटीबंधीय भागातील पाणी असामान्य पद्धतीनं गरम होतं. सामान्य अल नीनो प्रत्येक २ ते ७ वर्षात येतात. मात्र यावेळी सुपर किंवा मेगा स्ताराचा अल नीनो तयार होत आहे. समुद्रातील उष्टतेची लाट पॉझिटिव्ह पॅसिफिक मेरिडियनल मोड आणि उष्ण दक्षिणी हवा ही त्याची कराणे आहेत.
बेन नॉल सारख्या हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या उष्णतेच्या लाटा अल नीनोला अजूनच बळ देत आहेत. उष्णता आणि आद्रता वाढल्यामुळं पश्चिमेकडील देशांमध्ये उष्णता वाढली असून उष्णतेच्या लाटा वेगवान होऊ शकतात. गेल्या १४० वर्षात असा पॅटर्न तयार झाला नव्हता आता तो होत आहे असं शास्त्रज्ञांचे मत आहे.
सध्याच्या घडीला पॅसिफिक महासागरात ८०४६ किलोमीटर लांब उष्णतेची लाट पसरली आहे. ही माईक्रोनेशियापासून सुरू होते ते कॅलिफोर्नियापर्यंत पोहचत आहे. कॅलिफोर्नियाच्या जवळ याला ब्लॉब असं म्हटलं गेलं आहे. इथं समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान रेकॉर्ड स्तरावर पोहचलं आहे. NOAA च्या अहवालानुसार ही लाट ज्या स्तरावर तयार होत आहे ती महाकाय आहे.
ही लाट अल नीनोला वेगानं बळ देत आहे. त्यामुळं याचा परिणाम समुद्रातील जीवांवर पडत आहे. हवामानाचा पॅटर्न पूर्णपणे बदलत आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार ही उष्णतेची लाट अल नीनोला अजून वाढवू शकते. त्यामुळं संपूर्ण वर्षभर हवामान अनियमीत राहू शकते.
१८७७ - ७८ मध्ये अल नीनो इतिहासात सर्वात विनाशकारी अल नीनो ठरला होता. त्याच्या उष्णतेच्या लाटांमुळे दुष्काळ आणि पीकांचे मोठे नुकसान झाले होते. लोखो लोकांची जीव गेला होता. आता शास्त्रज्ञांच्या मते २०२६ मधील अल नीनो हा त्यापेक्षाही शक्तीशाली असण्याची शक्यता आहे. एप्रिल २०२६ च्या हवामान मॉडल्समध्ये शास्त्रज्ञ हार्ट पल्पिटेशंस जाणवत आहे. जर सुपर अल नीनो तयार झाले तर २०२७ मध्ये जागतिक तापमान नव्या रेकॉर्ड ब्रेक स्तरावर पोहचू शकतं. जागतिक हवामान बदलाच्या काळात हे जास्तच धोकादायक होऊ शकतं.
अल नीनोचा प्रभाव हा संपूर्ण जगावर पडणार आहे. त्यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आणि मध्ये अफ्रिका, भारत आणि अमेझॉनचे जंगल या ठिकाणी दुष्काळ आणि भयानक उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तसेच आग लागण्याची देखील मोठी शक्यता आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावर पूर येऊ शकतो.
भारत हा मेगा अल नीनोचा सर्वात जास्त प्रभाव पडणारा देश आहे. शास्त्रज्ञांच्या मते २०२६ च्या उन्हाळ्यात तापमान सामान्य स्तरापेक्षा खूप वाढणार आहे. दिल्ली, एनसीआर, राजस्थान आणि उत्तर भारतात एप्रिल महिन्यातच तापमान ४० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचलं आहे. अल नीनोमुळे मानसूपूर्वीची उष्णता अजून भयानक होण्याची शक्यता आहे.
जून ते सप्टेंबर महिन्यात मान्सून फारसा प्रभावी असणार नाही. त्यामुळं दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात दुष्काळासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. कृषी क्षेत्र प्रभावित होऊ शकतं. उन्हाळा लांबू शकतो आणि तीव्र होऊ शकतो. वातावरणात आद्रता जास्त असेल त्यामुळं एकूण उन्हाळ्यात तापमान वाढेलच तसेच लोकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागेल.