Heatwave : उष्णलहरीमुळे पशुधनाला धोका; बचावासाठी तातडीच्या उपाययोजना आवश्यक

यावर्षीच्या उन्हाळ्यात तापमानात सरासरीपेक्षा किमान 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढ
Livestock heatwave protection
Livestock Pudhari
Published on
Updated on

Livestock heatwave protection

वाशिम : जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उन्हाळ्यातील तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा किमान 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढले आहे. याचा थेट परिणाम पशुधन व कुक्कुट पक्ष्यांवर होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात (हीट स्ट्रोक) व उष्णलहरींचा धोका निर्माण झाला असून, पशुधन आजारी पडणे किंवा दगावण्याची शक्यता वाढली आहे.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ सरासरीपेक्षा अधिक तापमान राहिल्यास उष्णलहरीची स्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत पशुधनाच्या शरीरातील पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होऊन निर्जलीकरण (डिहायड्रेशन) होते. परिणामी चारा व खाद्य घेण्याचे प्रमाण घटते व उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो.

Livestock heatwave protection
Mahad Heatwave: महाडमध्ये उन्हाचा तडाखा तीव्र; तापमान ४५ अंशांच्या उंबरठ्यावर

उष्णलहरीपासून बचावासाठी पशुधनाला थंड वातावरणातून अचानक उष्ण वातावरणात नेणे टाळावे. जनावरांना केवळ दिवसाच्या थंड वेळेत चरायला सोडावे तसेच उष्ण काळात सावलीत किंवा हवेशीर निवाऱ्यात ठेवावे. वाढत्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी पशुधनाला हळूहळू सवय लावणे आवश्यक आहे.

लहान वासरे, करडे, काळ्या किंवा गडद रंगाचे प्राणी, श्वसनाच्या आजाराने ग्रस्त जनावरे, वराह व दुभती जनावरे तसेच कुक्कुट पक्षी यांना उष्माघाताचा विशेष धोका असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Livestock heatwave protection
Heatwave India Study: देशात उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ; पुण्यात IITM-आरबीआय करार

उष्माघाताची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये धाप लागणे, श्वासाचा वेग वाढणे, पाणी जास्त प्रमाणात पिणे, चारा कमी खाणे, सुस्ती येणे, लाळ गाळणे, नाकपुड्या कोरड्या पडणे व शरीरातील पाणी-क्षारांचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावणे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news