राष्ट्रीय

Hardeep Singh Nijjar : निज्जरच्या हत्येचा कट पाकिस्तानात रचला!

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर पार्किंग क्षेत्रात 18 जून रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या करण्यात आली. या हत्येचा कट पाकिस्तानात रचल्याची नवी माहिती समोर आली आहे. (Hardeep Singh Nijjar)

खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले आहेत. निज्जरची हत्या भारतानेच केली असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी केल्याने वाद चिघळला आहे. परंतु, भारताने आपली भूमिका स्पष्ट केली असून जगभरातूनही भारतालाच पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, निज्जरच्या हत्येचा कट पाकिस्तानात रचला असल्याचे वृत्त समोर आले आहे. एका इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. भारत आणि कॅनडामधील संबंध ताणण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स ने दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात हत्या घडवून आणली. (Hardeep Singh Nijjar)

कॅनडाच्या आरोपावर परराष्ट्रमंत्र्यांनी दिले चोख प्रत्युत्तर

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, मागील काही वर्षांत कॅनडात अनेक संघटित गुन्हे घडले. फुटीरतावादी शक्तींकडून संघटित गुन्हे आणि हिंसाचार झाला. हे सर्व एकमेकांमध्ये फार मिसळून गेलेले आहे. त्यामुळेच आम्ही तपशील आणि माहितीवर बोलत आहोत. भारत सरकारने कॅनडाला मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची आणि तेथून बाहेर देशात गुन्हे करणार्‍या नेत्यांची माहिती दिली आहे. भारताने मोठ्या संख्येने प्रत्यार्पणाची विनंती केली आहे, असेही त्यांनी नमूद केले. (Hardeep Singh Nijjar)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT