Gyanesh Kumar Controversy pudhari
राष्ट्रीय

Gyanesh Kumar Controversy: ज्ञानेश कुमार प्रकरणावरून NDA मध्ये नाराजी; भाजपच्या मित्रपक्षांनीच केली मोठी मागणी

मुख्य निवडणूक आयुक्तांवरील गंभीर आरोपांनंतर NDA मध्ये नाराजीचा सूर... स्पष्टीकरण देण्याची जाहीर मागणी

Anirudha Sankpal

Gyanesh Kumar Controversy: भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर प्रक्रिया राबवताना मनमानी पद्धतीनं मतदारांची नावे समाविष्ट आणि डिलीट केल्याचा आरोप होत आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्ताने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केलीच आहे. आता एनडीएमधून देखील या प्रकरणी नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

एनडीएमध्ये नाराजी

निवडणूक आयोगाच्या कारभारावर भाजपचे मित्र पक्ष नाराज असल्याचं समोर येत आहे. निवडणूक आयुक्तांनी याबाबतचे स्पष्टीकरण द्यावं अशी भूमिका सत्तेतील नेते आणि मंत्री घेत आहेत. लोजपचे प्रमुख चिराग पासवान आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे उपेंद्र कुशवाहा यांनी निवडणूक आयुक्तींनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे.

आयोगाने स्पष्टीकरण द्यावे

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी निवडणूक आयोगाला या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. ते म्हणाले की, 'जनतेचा निवडणूक प्रणालीवरून विश्वास उठला तर तो लोकशाहीसाठी घातक ठरेल. त्यामुळं ज्या काही शंका आहेत आणि आरोप होत आहेत त्याचे निरसन आयोगाने करण्याची गरज आहे.'

आजी आजोबांची माहिती का विचारता

दुसरीकडे राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांनी आयोगाला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, 'आपल्या देशातील लोकांना त्यांच्या आजी आजोबांची माहिती का विचारली जात आहे. याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. आयोगाने तातडीने या प्रकरणाबाबतच्या प्रश्नांची, आरोपांविषयी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे.'

SCROLL FOR NEXT