GST Notice Controversy pudhari photo
राष्ट्रीय

GST Notice Controversy: पगार ६ हजार, व्यवहार ११ कोटींचा अन् टॅक्स नोटीस २ कोटींची... खासगी शिक्षकाचे धाबेच दणाणले; नेमकं काय घडलं?

ओम प्रकाश हे डुमरियागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरवाठिया मुस्तकहम गावचे रहिवासी आहेत.

Anirudha Sankpal

GST Notice PAN Card Fraud: एका युकवाला गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स विभागाची तब्बल २ कोटी रूपये टॅक्स जमा करण्याची नोटीस आल्याने त्याचे धाबेच दणाणले. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील डुमरियागंज तालुक्यात राहणाऱ्या ओम प्रकाश वर्मा जीएसटीच्या या नोटीशीमुळं चांगलेच टेन्शनमध्ये आले आहेत. त्यांनी मी गरीब आहे. सहा-सात हजार रूपयांची नोकरी करतोय मला विनाकारण यात फसवलं जात आहे असा आरोप केला आहे.

ओम प्रकाश हे डुमरियागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरवाठिया मुस्तकहम गावचे रहिवासी आहेत. त्यांना जीएसटी विभागाकडून १ कोटी ९९ लाख ४२ हजार ३१३ रूपयांच्या टॅक्सची नोटीस मिळाली. ही नोटीस त्यांना पोस्टाद्वारे १० फेब्रुवारी रोजी मिळाली.

ओम प्रकाश जागचे उडाले

नोटीस वाचताच ओम प्रकाश जागचे उडाले. त्यांना फक्त सहा ते सात हजार रूपये पगार मिळतो. ते एक खासगी शिक्षक आहेत. ओम प्रकाशने डुमरियागंज पोलीस ठाण्यात या प्रकरणी अर्ज दाखल केला आहे.

यानंतर जीएसटीच्या मुख्य कार्यालयातून माहिती मिळाली की ओम प्रकाश यांच्या पॅनकार्डचा कोणीतरी गैरवापर केला आहे. त्यांनी नवी दिल्ली आणि फरूखाबादमध्ये वेगवेगळ्या फर्म तयार केल्या आहेत. या फर्मद्वारे पैशाचे व्यवहार करण्यात आले आहेत. याच नवी दिल्लीतील ओम ट्रेडर्सने गेल्या वर्षात ११ कोटी ७ लाख ९० हजार ६२८ रूपयांचा व्यवहार केला. याचा जीएसटी हा १ कोटी ९९ लाख ४२ हजार ३१३ रूपये इतका देय आहे. त्यामुळं ओम प्रकाश वर्मा यांना जीएसटी विभागाकडून नोटीस बजावण्यात आली.

पीडित शिक्षकाचा पॅन कार्ड घोळ

पीडित खासगी शिक्षक ओम प्रकाश यांनी सांगितलं की, 'मी बरवठिया मुस्तकहम सिद्धार्थनगरचा राहणारा आहे. मी पॅनकार्ड तयार केलं होतं. मात्र त्याचा कोणीतरी गैरवापर केला आहे. दिल्लीतील ओम ट्रेडर्स नावाची आणि दुसरी फरूखाबाद वर्मा एंटप्राईजेस नावाच्या अशा दोन कंपन्या या पॅनकार्डवर नोंदणी झाल्या आहेत. मला १० फेब्रुवारी रोजी नोटीस मिळाली. २ कोटींची नोटीस आली आहे. मी गरीब माणूस आहे. मला आता भीती वाटत आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी मी इकडे तिकडे पळापळ करतोय. मी डुमरियागंज पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे.'

दरम्यान, पीडित नौगड गेला असता त्यांना कर उपायुक्तांनी सांगितलं की या कंपन्या तुमच्या नावाने रजिस्टर झाल्या आहेत. तेव्हापासून मी इकडे तिकडे पळापळ करत आहे. ही नोटीस दिल्लीतून आली आहे. मी एक खासगी शिक्षक आहे. माझा पगार सहा ते सात हजार आहे. माझी मागणी आहे की या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी व्हावी, मला यामध्ये विनाकाराण फसवलं जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT