Gorakhpur Crime News pudhari
राष्ट्रीय

Gorakhpur Crime News: योगींच्या गोरखपूरमध्ये चाललंय काय? बहिणीच्या छेडछाडीची तक्रार केली; ९ वर्षाच्या चुमकल्याला घेरून मारलं

Anirudha Sankpal

Gorakhpur Crime News: जमावाने ९ वर्षाचा मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना पिपराईच इथं घडली आहे. या हल्ल्यात ९ वर्षाच्या मुलाचा १६ वर्षाचा चुलत भाऊ देखील जबर जखमी झाला आहे. या हल्ल्यात जमावाने लोखंडी रॉड, लाकडी स्टीक आणि विटांचा वापर केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ वीत शिकणाऱ्या मुलीचा छळ केल्याची तक्रार करण्यात आली होती.  त्याच्या रागातूनच हा हल्ला झाला आहे. 

सारस चौथीत शिकत होता

हल्ल्यात मृत्यू झालेल्या सारस सिंग हा चौथीत शिकत होता. त्याचा चुलत भाऊ शिव कुमार हे पान शॉपपासून जात होते. त्यावेळी बेला कांता क्रॉसिंग इथं हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सांगितलं की या जमावाला शिव कुमार याला मारायचं होतं. मात्र सारस हा त्यांला वाचवण्याच्या प्रयत्नात दगावला. त्याला गंभीर दुखापत झाली. 


या हल्ल्यानंतर दोघांनाही पिपराईच कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याला बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन जाण्यास सांगण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान सारस रविवारी पहाटे २ वाजता दगावला. तर शिव कुमार हा अजूनही गंभीर आहे. 

बहिणीची छेड काढल्याची तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक तरूणांनी ११ वी मध्ये शिकणाऱ्या शिव कुमारच्या घरातील मुलीची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला होता. ही तक्रार गेल्या आठवड्यात जुलै महिन्यात करण्यात आली होती. त्यानंतर गावच्या पंचायतमध्ये हा विषय मिटवण्यात आला होता. मात्र दोन्ही गटांमध्ये तणाव होता. 


दरम्यान, जवळपास सहा आरोपी हे मृत सारसचे वडील राजू सिंग यांच्या पान शॉपवर पोहचलं. त्यावेळी राजू सिंग तिथं नव्हते. त्यानंतर जमावाने सारस आणि शिव कुमार यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना पिपराईच पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध केलेल्या तक्रारीचा राग होता. 

आरोपी फरार

या घटनेनंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटना स्थळी दाखल झाले आहे. पुरावे गोळा करण्यात येत आहे. तसेच पोलीस सीसीटीव्ही फुटेज देखील गोळा करत आहेत. प्रत्यक्षदर्शींचे जबाब देखील नोंदवले जात आहेत. 


एसपी जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, 'राजू सिंह यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यांनी काही युवकांची नावे सांगितली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी तीन पथके तयार केली आहे. आरोपी हल्ल्यानंतर फरार झाले आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT