Nanded crime news: देगाव फाट्यावर देशी दारूची चोरटी वाहतूक उधळली; ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

सपोनी विशाल भोसले पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; दोघांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा
Nanded crime news: देगाव फाट्यावर देशी दारूची चोरटी वाहतूक उधळली; ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

नायगाव : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या विशेष गस्ती मोहिमेदरम्यान देगाव फाटा येथे देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत देशी दारूच्या ९६ बाटल्या व मोटारसायकलसह ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Nanded crime news: देगाव फाट्यावर देशी दारूची चोरटी वाहतूक उधळली; ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त
Nanded bribery case : आधी रामोड, आता लखमावाड, झाला गजाआड!

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विशाल भोसले, हेड कॉन्स्टेबल कंधारे व पोलीस कॉन्स्टेबल हंबर्डे हे कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पेट्रोलिंग करीत असताना देगाव फाटा येथे संशयास्पदरीत्या येणारी एमएच-२६-सीए-८९६४ क्रमांकाची पल्सर मोटारसायकल अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोटारसायकलवरील खाकी रंगाच्या पोत्यामध्ये 'देशी भिंगरी संत्रा' ब्रँडच्या ९६ दारूच्या बाटल्या आढळून आल्या.

Nanded crime news: देगाव फाट्यावर देशी दारूची चोरटी वाहतूक उधळली; ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त
Nanded news: विकास कागदावरच!  रस्त्याविना नांदेडच्या भाटु तांड्यातील गर्भवती महिलेला खाटेवरून रुग्णालयात नेण्याची वेळ

या दारूच्या साठ्याची किंमत ७ हजार ६८० रुपये असून, ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. असा एकूण ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी रामेश्वर गुणवंतराव गुडपे (वय ३०) व बालाजी गोविंदराव गुडपे (वय २८, दोघेही रा. देगाव, ता. नायगाव) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कुंटूर पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news