Crime News : लॉटरीचे आमिष दाखवून वृद्धेचे दागिने लुटणारा तोतया गजाआड

तब्बल २५.५ तोळे सोने जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
Crime News
Crime News : लॉटरीचे आमिष दाखवून वृद्धेचे दागिने लुटणारा तोतया गजाआडfile photo
Published on
Updated on

Impostor who robbed elderly woman of her jewelry by luring her with a lottery scheme put behind bars

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वृद्ध महिलांना हेरून लॉटरी लागल्याचे आमिष दाखवायचे, तर कधी स्वतः पोलिस असल्याची बतावणी करून त्यांचे दागिने हातोहात लांबवायचे, गेल्या अनेक वर्षांपासून शहरात धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत भामट्याच्या गुन्हे शाखेने अखेर मुसक्या आवळल्या. आफताब ऊर्फ फहीम अहमद शेख (५२, रा. किराडपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल २६.५ तोळे सोने, चोरीची दुचाकी असा २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे आफताबला टक्कल असल्याने तो गुन्हा करताना डोक्याला कधी विग तर कधी टोपी लावून पोलिसांना चकवा द्यायचा.

Crime News
PR card survey : पीआर कार्ड सर्वेक्षणाच्या कामासाठी महानगरपालिकेचा ६ कोटींचा प्रस्ताव

अधिक माहितीनुसार, २६ जुलै रोजी हसूल टी-पॉइंटजवळ त्याने कमलबाई शिंदे (६८) या आजींना लॉटरी लागल्याची थाप मारून ३ तोळ्यांच्या बांगड्या लांबवल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेने शहरातील सुमारे २५० सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर खबदाऱ्यांना कामाला लावले. एका खबऱ्याने आफताबची माहिती पोलिसांना दिली. तसेच त्याच्या दुचाकीचा नंबर मिळाला आणि तो जाळ्यात अडकला. ही दुचाकीही त्याने नागपुरातून चोरल्याचे उघड झाले आहे. त्याने सराफाला विक्री केलेले सोने पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, हवालदार योगेश नवसारे, संदीप तायडे, विजय निकम, प्रदीप ठंडवते. बाल लहरे जालिंदर गोरे, योगेश यमदल

वेषांतर करून तोतयेगिरी

आफताबचे कुटुंब हैदराबादला स्थायिक झालेले आहे. मात्र बहीण शहरात राहत असल्याने तो वर्षभरापासून इथे येत-जात होता. पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी तो कधी डोक्याला टोपी, तर कधी चक्क विग लावून फिरायचा. एकट्या-दुकट्या वृद्ध महिलांना हेरून तो त्यांचे दागिने लुटायचा. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने २६ जुलै रोजी हसूल टी-पॉइंट परिसरात आर्जीच्या ३ तोळ्यांच्या बांगड्या लुबाडून दुचाकीने विद्यापीठ परिसरात जाऊन दुचाकी तिथेच उभी केली. रिक्षाने मकाईगेटला उतरला. तेथून पुन्हा दुसरी रिक्षा पकडून गांधीनगर गाठले. पुन्हा तिसरी रिक्षाने किराडपुऱ्यात गेला. पोहोचला. मात्र गुन्हे शाखेने मार्गावरील सीसीटीव्ही तपासून अखेर त्याला बेड्या ठोकल्या.

Crime News
Chhatrapati Sambhajinagar rain : मुसळधार पावसाने खेळणा धरण ३० टक्क्यांवर

हॉस्पिटलच्या फाईल दाखवून दागिने विक्री

आफताबला हृदयविकाराचा त्रास असून, त्याची बायपास सर्जरी झालेली आहे. याच आजाराचा फायदा घेत तो चोरीचे दागिने विकण्यासाठी शहरातील सराफांकडे जायचा. हॉस्पिटलच्या कामासाठी पैशाची खूप गरज आहे, दागिन्यांच्या पावत्या नंतर देतो, अशी भावनिक थाप मारून तो चोरीचे सोने मिळेल त्या भावात विकायचा आणि काही दिवस हैदराबादला पळून जायचा. पुन्हा शहरात येऊन लूटमार करायचा. त्याच्यावर पुणे आणि हैद्राबादला यापूर्वी चार ते पाच गुन्हे आहेत.

शहरातील ८ गुन्हे उघड

आफताबच्या अटकेमुळे सिडको (२), मुकुंदवाडी (२), पुंडलिकनगर (२), क्रांती चौक आणि हर्मूल प्रत्येकी (१) आणि नागपूर येथून दुचाकी चोरी असे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील पाच गुन्हे यावर्षीचे आहेत. तर पुंडलिकनगर येथील एक गुन्हा २०२२ आणि २०२५ या वर्षीचे आहेत. पुंडलिकनगरच्या २०२२ सालच्या गुन्ह्यात आरोपीने फिर्यादी शोभा वाघचौरे यांना थेट घरी जाऊन तुमचा मुलगा मनोज कुठे आहे, त्याला लॉटरी लागल्याचे

logo
Pudhari News
pudhari.news