Gyanesh Kumar EC Controversy pudhari
राष्ट्रीय

Gyanesh Kumar EC Controversy: ज्ञानेश कुमारांवर पुन्हा लेटर बॉम्ब? RTI मधून अंतर्गत वादाबाबत मोठी माहिती आली समोर

कॅबिनेट सचिवालयाने तक्रारीचे पत्र थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यलयाकडे पाठवलं.

Anirudha Sankpal

EC Complaint letter Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून बाहेर येत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरूद्ध देशभरात मोठी आंदोलने होत आहेत. आता या प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर आली आहे. RTI मधून मागवलेल्या माहितीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

दोन आयुक्तांचे पत्र

निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी या दोघांनी वरिष्ठ डेप्युटी इलेक्शन कमिशनर मनीष गर्ग यांच्या कथित दुष्कृत्याबाबत कॅबिनेट सचिवांना पत्र लिहिलं होतं. कॅबिनेट सचिवालयाने हे पत्र मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यलयाकडे पाठवलं. तसेच या तक्रारीवर कॅबिनेट सचिवालयाने कोणतीची कारवाई केली नसल्याचं देखील समोर आलं आहे.

फाईल थेट ज्ञानेश कुमारांच्या टेबलवर

माहितीच अधिकार (RTI) अंतर्गत फाईल वरील नोटवरून कॅबिनेट सचिवालयाने या पत्रांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचा सल्ला मागितला असल्याचं उघड झालं आहे. आरटीआय कार्यकर्ता लोकेश बत्रा यांनी ही याचिका दाखल केली होती. त्यात मिळालेल्या कागदपत्रावरून अनेक महत्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सचिवालयाने निवडणूक आयुक्तांच्या तक्रारीवर या तक्रारी वैयक्तिक कपॅसिटीमधून करण्यात आल्या आहेत. निडवणूक आयोगाकडून कोणतेही अधिकृत पत्र आलेले नव्हते. त्यामुळं या स्तरावर कोणतीही कारवाई करणे योग्य ठरले नसते असं सांगितलं आहे.

कारवाई नाही

माहितीनुसार ३ ऑगस्ट रोजी सचिवालयाने सीईसी ज्ञानेश कुमार यांना या तक्रारींवर त्यांचे मत मागवण्यात आले होते. ४ ऑगस्ट रोजी यावरील नोटमध्ये लिहिले गेलं की दोन्ही निवडणूक आयुक्तांची चिठ्ठी ही वैयक्तिक कपॅसिटीमध्ये पाठवली आहे. निवडणूक आयोगाचा हा औपतारिक आदेश नाहीये. सचिवालयाने सांगितलं की निवडणूक आयोगात हस्तक्षेप होतोय असा संदेश जाईल असं कोणतंही पाऊल उचलू नये. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी कॅबिनेट सचिवालयाने दोन्ही आयुक्तांना त्यांच्या विभागाकडून पत्र मिळाल्याची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT