Gyanesh Kumar Suspension: आधी तपासणी करणार... ज्ञानेश कुमार निलंबन प्रकरणी SC चा अंतरिम आदेश देण्यास नकार

फॉर्म ६ मध्ये मॉडिफिकेशन कोणी केलं ते पाहणार असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाचा ज्ञानेश कुमार यांच्याविरूद्ध अंतरिम आदेश देण्यास नकार.
Gyanesh Kumar Suspension
Gyanesh Kumar Suspensionpudhari
Published on: 
Updated on: 

Gyanesh Kumar Suspension: सर्वोच्च न्यायालयाने आज (दि. ५ ऑक्टोबर) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करणाऱ्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत इतर दोन निवडणूक आयुक्तांना नोटिस पाठवली आहे.

Gyanesh Kumar Suspension
Sanjay Raut : "केवळ ज्ञानेश कुमार पदावरून पायउतार होणार नाहीत..." : गर्जना मोर्चावर संजय राऊत काय म्हणाले?

आधी तपासणी, मग निर्णय रद्द

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील बेंचने या प्रकरणी सुनावणी करताना मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगावर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण मागितलं आहे. न्यायालयाने आम्ही आधी निवडणूक आयोगाने याबाबत सर्व नियमांचे पालन झाले आहे का नाही त्याची तपासणी करणार. जर कोणता निर्णय घेताना कायद्याचे पालन झालेलं नाही असं आढळलं तर तो निर्णय रद्द करता येईल.

Gyanesh Kumar Suspension
Gyanesh Kumar Controversy: ज्ञानेश कुमार प्रकरणावरून NDA मध्ये नाराजी; भाजपच्या मित्रपक्षांनीच केली मोठी मागणी

लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार चीफ जस्टीस ऑफ इंडिया सूर्यकांत म्हणाले की, 'आम्ही फॉर्म ६ मध्ये कोणतेही मॉडिफिकेशन करण्याची परवानगी दिली नव्हती हे आधी स्पष्ट करतो. ज्यावेळी रेकॉर्ड सादर केले जातील. त्यावेळी आम्ही त्यात मॉडिफिकेशन कोणी केलं हे पाहू. तुमची याचिका घाई गडबडीत केली असल्याचं दिसतंय.'

न्यायालयाने प्रतीवाद्यांना तुमच्या आरोपांना स्पष्टपणे आणि पारदर्शक उत्तर द्या असे देखील आदेश दिले आहेत. या प्रकरणी प्रतीवाद्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.

Gyanesh Kumar Suspension
CJI Surya Kant: "तुमची हिंमत कशी झाली?" CJP आंदोलनावरून दंडाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याला नोटीस बजावल्याने सरन्यायाधीश संतापले

याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?

सिंग यांनी कुमार यांचे या याचिकेवर अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत निलंबन करा अशी मागणी केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाचे बहु सदस्यत्व टिकवण्यासाठी त्यांना निलंबित करावे अशी मागणी याचिकेद्वारे केली होती. याचिकाकर्त्याने संधू आणि जोशी हे या काळात निवडणूक आयोगाचा कार्यभार संयुक्तरित्या सांभाळतील. तो दोघं सहमत होतील तोच निर्णय घेतला जाईल. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची जागा ही ज्या समितीत सीजेआयचा समावेश आहे त्या समितीने करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news