Delhi Blast Umar Mohammad Suicide Bombing:
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या मोहम्मद उमर नबी या दहशतवाद्याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो इंग्रजीमधून आत्मघातकी बॉम्बस्फोटाबाबत माहिती देतोय अन् आत्मघातकी बॉम्बस्फोट आणि तो करणाऱ्याची मानसिकता याबाबत सांगताना दिसतोय.
या व्हिडिओत उमर मोहम्मद उर्फ उमर उन नबी हा एकटाच आहे. हा त्याचा सेल्फ व्हिडिेओ आहे. या व्हिडिओत उमर मोहम्मद हा आत्मघातकी बॉम्बिंग हे योग्यरित्या समजून घेतलं गेलेलं नाही असं म्हणतोय.
मोहम्मद या व्हिडिओत म्हणतो, 'लोक आत्मघातकी बॉम्बिंगला समजण्यात अपयशी ठरतात.इथं लोकं मोठी चूक करतात. बॉम्ब स्फोटाचा किंवा आत्मघातकी बॉम्ब स्फोटाचा विचार नेमका काय आहे. त्याच्याविरूद्ध अनेक विरोधाभास आणि अनेक तर्क आहेत.'
दिल्ली बॉम्ब ब्लास्टमधील मुख्य आरोपी उमर मोहम्मद पुढे म्हणतो, 'आत्मघातकी हल्ल्याची मुख्य समस्या ही ज्यावेळी एखादी व्यक्ती मान्य करते की त्याचा मृत्यू एका निश्चित वेळी आणि निश्चित स्थानावर होणार आहे त्यावेळी तो एका धोकादायक मानसिकतेत जातो. त्यावेळी तो व्यक्ती मानतो की त्याचा मृत्यू हे त्याचे एकमेव ध्येय आहे.'
'मात्र सत्य हे आहे की असा विचार, अशी परिस्थिती कोणत्याही लोकशाही या मानवी व्यवस्थेत स्वाकार्य नाही. कारण हा विचार जीवन, समाज आणि कायदा या मुलभूत सिद्धांतांचे उल्लंघन करतो.'
उमर मोहम्मदचा हा नवा व्हिडिओ एवढाच आहे. त्यामुळं त्याचे आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याबाबत काय विचार आहेत हे स्पष्ट होत नाहीत. मात्र या व्हिडिओत उमर हा खूप शांत आणि सहज वाटतोय. मात्र हा व्हिडिओ दहशतवाद्यांची सायकॉलॉजी समजून घेणाऱ्यांसाठी खूप महत्वाचा असू शकतो.