Pahalgam attack Terrorist recognition
श्रीनगर : श्रीनगरच्या हरवान परिसरात 28 जुलै रोजी झालेल्या 'ऑपरेशन महादेव' दरम्यान मारण्यात आलेले तीन दहशतवादी हे पाकिस्तानचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या शवांवरून सापडलेली पाकिस्तानी कागदपत्रे, जैवमाहिती (बायोमेट्रिक्स), आणि पाकमधील सरकारी डेटाबेसमधील डेटा यांच्या आधारे त्यांची ओळख पटवली आहे.
मारले गेलेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे (LeT) वरिष्ठ कमांडर होते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे-
सुलेमान शाह उर्फ फैझल जट्ट – 'ए' श्रेणीतील दहशतवादी व पाहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड
अबु हमझा उर्फ अफगान – 'ए' ग्रेड कमांडर
यासिर उर्फ जिब्रान – 'ए' ग्रेड कमांडर
पाकिस्तानच्या NADRA (राष्ट्रीय डेटाबेस आणि नोंदणी प्राधिकरण) या संस्थेकडून मिळालेले फिंगरप्रिंट व फेस स्कॅन.
इलेक्शन कमिशन ऑफ पाकिस्तानने जारी केलेली दोन लॅमिनेटेड मतदार ओळखपत्रे – एक लाहोर (NA-125) आणि दुसरे गुजरानवाला (NA-79) येथील.
सॅटेलाईट फोन वरील कॉल लॉग्स आणि SD कार्डमधील NADRA-संबंधित डिजिटल ओळख.
CandyLand व ChocoMax या कराचीत बनवलेल्या चॉकलेट्सचे पाकिटे – त्यावरील लॉट क्रमांक २०२४ मधील मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) ला पाठवलेल्या कन्साइनमेंटशी जुळणारे.
GPS उपकरण (Garmin) मधून मिळालेली भौगोलिक माहिती – हल्ल्यादरम्यान वापरलेल्या ठिकाणांशी जुळणारी.
AK-103 रायफल्सचे गोळ्यांचे बॅलिस्टिक पुरावे – पाहलगामच्या बाईसरण हल्ल्यात वापरल्या गेलेल्या शस्त्रांशी तंतोतंत जुळणारे.
DNA तपासणी – पाहलगाम येथे सापडलेल्या रक्ताने माचलेले शर्ट व मृत दहशतवाद्यांच्या जैविक प्रोफाइलशी जुळणारे DNA.
21 एप्रिल रोजी हे तिघे बैसरण परिसरात एका स्थानिक झोपडीत थांबले होते. परवेज व बशीर अहमद जोथर या दोन स्थानिकांनी त्यांना अन्न व आसरा दिला होता, असे चौकशीत उघड झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 एप्रिल रोजी या तिघांनी पाहलगाममध्ये 26 जणांचा बळी घेतला.
त्यानंतर ते डाचिगाम-हरवानच्या जंगलात लपून बसले होते. Huawei सॅटेलाईट फोन मधून त्यांच्या हालचाली ट्रॅक केल्या गेल्या होत्या. Inmarsat-4 F1 सॅटेलाईट ला दररोज रात्री सिग्नल पिंग होत असल्याचे आढळले.
सजिद सैफुल्ला जट्ट, लष्करचा दक्षिण काश्मीर प्रमुख – पाकिस्तानातील चंगा मंगा (लाहोर) येथून ऑपरेशनचे नियंत्रण करत होता.
त्याचे व्हॉईस सॅम्पल्स – सॅटेलाईट फोनवरील कॉल्सशी जुळणारे असल्याचे निष्पन्न झाले.
रिझवान अनीस, लष्करचा रावळकोट प्रमुख – 29 जुलै रोजी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना भेटला व त्यांच्या सन्मानार्थ ग़ायबाना नमाज़-ए-जनाज़ा (अनुपस्थितीत मृतांची प्रार्थना) आयोजित केली. त्याचा व्हिडिओ भारताने अधिकृत डोझियरमध्ये समाविष्ट केला आहे.
24 एप्रिल रोजी पोलिसांनी जाहीर केलेली तीन संशयितांची स्केचेस (हाशिम मूसा, अली भाई उर्फ तळ्हा, आणि आदिल हुसेन ठोकर) चुकीच्या फोटोंवर आधारित असल्याचे स्पष्ट झाले. ती चित्रे डिसेंबर 2024 मधील एका स्वतंत्र चकमकीशी संबंधित होती.
या प्रकरणात सादर झालेले पुरावे – सरकारी कागदपत्रे, जैविक माहिती, डिजिटल डेटा आणि पाकमधील क्रियाशील संपर्क – हे सर्व मिळून पाकिस्तानचा थेट सहभाग आणि पाठिंबा स्पष्ट करतात. यामुळे भारताने हे सर्व पुरावे आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याची तयारी सुरू केली आहे.