राष्ट्रीय

दिल्लीतील पाणी टंचाईच्या नवीन महाराष्ट्र सदनालाही झळा

अविनाश सुतार
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीमध्ये भीषण पाणीटंचाई सुरु असून त्याचा फटका दिल्लीत आलेल्या महाराष्ट्रातील पाहुणे मंडळींना देखील बसला आहे. नवीन महाराष्ट्र सदनातील पाणीपुरवठा सोमवारी बंद असल्याने येथे मुक्कामी असलेल्या पाहुण्यांची गैरसोय झाली.
सकाळी  वॉश बेसीन आणि आंघोळीसाठीही नळाला पाणी येत नसल्याने मुक्कामी असलेल्यांचे हाल झाले. याठिकाणी मुक्कामी असलेल्या एका केंद्रीय मंत्र्यांनाही पाणी टंचाईचा फटका बसला. नवीन महाराष्ट्र सदनाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलीआहे.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT