नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा
केजरीवाल यांना 20 जून रोजी कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. 21 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या जामीनाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे.
केजरीवाल यांना जामीन देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाला स्थगिती मागणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज (मंगळवार) दुपारी 2:30 वाजता निकाल देणार आहे. सोमवारी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) न्यायालयात ट्रायल कोर्टाचा आदेश सदोष असल्याचे म्हटले आणि केजरीवाल यांना दिलासा मिळू नये, असे म्हटले आहे.
केजरीवाल यांना 20 जून रोजी कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. 21 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या जामीनाला आव्हान देत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, केंद्रीय तपास संस्थेने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी तातडीचा अर्ज दाखल केला.
सुटीतील न्यायमूर्ती जैन यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेतल्यानंतर स्थगिती अर्जावरील निर्णय राखून ठेवताना, आदेश जाहीर होईपर्यंत वादग्रस्त आदेशाला स्थगिती दिली जाईल, असे आदेश दिले. त्यानंतर केजरीवाल यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.