'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' स्टार तामायो पेरींचे निधन

हॉलिवूड अभिनेता तामायो पेरींवर शार्कचा हल्ला; वयाच्या ४९ व्या वर्षी निधन
Tamayo Perry Dies in Shark Attack
हॉलिवूड अभिनेता तामायो पेरींचे निधन file photo
Published on
Updated on

'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटातील अभिनेता तामायो पेरी यांचे हवाई येथे निधन झाले. रविवारी (दि.२५) दुपारी त्यांच्यावर शार्कने हल्ला केला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तमायो यांच्या निधनामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी अनेक हॉलिवूड चित्रपट केले आहेत.

शार्कच्या हल्ल्यामुळे तामायो पेरींचा मृत्यू

रविवारी तामायो पेरी गोट बेटावर सागरी सुरक्षा जीवरक्षक आणि सर्फिंग प्रशिक्षकांसह होते. यावेळी शार्कने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, यामध्ये ते गंभीर जखमी झाले. शार्कने तामायो यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतला होता. त्यांना ताबडतोब जेट स्कायने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तामायो यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. 'ब्लू क्रश' आणि 'चार्लीज एंजल्स फुल थ्रॉटल' मधील भूमिकांमुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news