Karnataka Politics pudhari photo
राष्ट्रीय

D. K. Shivakumar Karnataka Politics: जारकीहोळींची भेट, सिद्धरामय्यांचे लॉबिंग सुरू... खर्गेंचेही नेतृत्व बदलाबाबत मोठे वक्तव्य

डीके शिवकुमार आणि त्यांच्या गटातील नेते दिल्लीत आपला तळ ठोकून आहेत. ते काँग्रेस हाय कमांडवर निर्णय घेण्यासाठी दबाव देखील टाकत आहेत.

Anirudha Sankpal

Karnataka power tussle:

महाराष्ट्राचे शेजारी राज्य कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वातील एक गट अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युलाची आठवण करून देत जोरदार लॉबिंग सुरू केलं आहे. दिल्लीतूनही या नेतृत्वबदलाबाबत गांभिर्यानं विचार होत आहे. डीके शिवकुमार आणि त्यांच्या गटातील नेते दिल्लीत आपला तळ ठोकून आहेत. ते काँग्रेस हाय कमांडवर निर्णय घेण्यासाठी दबाव देखील टाकत आहेत.

एकीकडे डीके शिवकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार अशी चर्चा सुरू असतानाच दुसरीकडं विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील आपली खुर्ची वाचवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलं आहे. त्यांनी आपल्या जवळच्या नेत्यांसोबत बैठक घेतली आहे. त्यात गृहमंत्री जी परमेश्वरा, सतीश जारकीहोळी आणि इतर नेत्यांचा देखील समावेश आहे.

सिद्धरामय्या देखील तयारीत

कर्नाटकमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत सीएम सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री निवासस्थानावर जवळच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री जी परमेश्वरा, सतीश जारकीहोळी आणि महादेवप्पा, व्यंकटेश यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. आमदार राजन्ना यांचा देखील यात समावेश होता.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीवर मोठं वक्तव्य केलं. त्यांनी आम्ही सर्वांना बोलवून चर्चा करू, या चर्चेत राहुल गांधी देखील उपस्थित राहणार आहेत. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. खर्गेंनी आम्ही सर्व एक टीम असून मी एकटा नाही. पार्टी हाय कमांडची टीम चर्चा करून निर्णय घेईल.

सतीश जारकीहोळींशी चर्चा

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सतीश जारकीहोळी यांच्याशी ब्रेकफास्ट मिटिंग आयोजित केली होती. या बैठकीला बीके हरिप्रसाद, महादेवप्पा यांचा देखील समावेश होता. या बैठकीनंतर सतीश जारकीहोळी आणि सिद्धरामय्या हे आपल्या सहयोगी मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री कार्यालयातून बाहेर पडले.

यापूर्वी डीके शिवकुमार देखील जारकीहोळींना भेटले असून त्यांनी जारकीहोळींना उपमुख्यमंत्री अन् काँग्रेसचे प्रदाशाध्यक्षपद देऊ केल्याची चर्चा रंगली आहे.

डीके दिल्लीत तंबू ठोकून

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या डीके शिवकुमार आणि त्यांच्या समर्थक गटानं दिल्लीत आपला तंबू ठोकला आहे. ते काँग्रेस नेतृत्वावर जबाव निर्माण करत आहेत. डीके शिवकुमार गटाचे नेते पक्षानं लवकर निर्णय घेऊन स्थिती स्पष्ट करावी अशी मागणी करत आहेत.

डीके शिवकुमार हे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी त्यांना वाट पाहण्याचा संदेश दिला आहे. त्यानंतर डीके शिवकुमार हे आता सोनिया गांधी यांच्याकडे जाणार असून ते २९ नोव्हेंबरला सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीत जाऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT