राष्ट्रीय

अमेरिकेची नागरिकांना ‘फाजील’ सूचना, म्‍हणे, बलात्कार, दहशतवादामुळे भारतात जाताना विचार करा

backup backup

पुढारी ऑनलाईन डेक्स : जगातील 'महासत्ता' असे बिरुद मिरवणार्‍या अमेरिकेने भारताचा अवमान करणारी एक सूचना आपल्‍या नागरिकांना केली आहे.   बलात्कारांच्‍या घटनांमध्‍ये झालेली वाढ, कोरोनाचे वाढते रुग्ण आणि जम्मू-काश्मीरमध्ये वाढत जाणारा दहशतवाद या कारणांमुळे भारतात जर कोणी प्रवास करणार असाल तर त्याचा पुन्हा विचार करावा, अशी फाजील सूचना अमेरिकेने आपल्‍या नागरिकांना केली आहे.

अमेरिकेच्या सेंटर फाॅर डिसिज कंट्रोलने भारतात कोरोनाचे वाढते रुग्ण विचारात घेऊन लेव्हर ३ स्तरावरील प्रवास आणि आरोग्य नोटीस जारी केलेली आहे. इतकंच नाही तर, अमेरिकेच्या जो बायडेन सरकारने आणखी एक नोटीस काढली आहे. यामध्‍ये म्‍हटलं आहे की, भारतात बलात्कार वेगाने वाढत चाललेले आहेत, त्यात वाढत चाललेल्या गुन्ह्यांपैकी एक आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे.

"अमेरिकन नागरिकांनी दहशतवाद आणि नागरी अशांतता लक्षात घेता जम्मू आणि काश्मीर राज्यात (पूर्व लडाख प्रदेश आणि त्याची राजधानी लेह वगळता) प्रवास करू नये. भारत-पाकिस्तान सीमेच्या १० किमी आत जाऊ नका, कारण सशस्त्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या रिपोर्टमध्ये बलात्कार हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी एक आहे. अत्याचारासारखे हिंसक गुन्हे पर्यटन आणि इतर ठिकाणी घडले आहेत. यामुळे पुन्हा विचार करा", असं स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे.

भारताला लेव्हल 3 ट्रॅव्हल ॲडव्हायझरीमध्ये ठेवत, यूएस स्टेट डिपार्टमेंटने आपल्या नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवासाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "तुम्ही FDA-मान्यता मिळालेल्या लसीने पूर्णपणे लसीकरण केले असल्यास, तुम्हाला कोविड-19 ची लागण होण्याचा आणि गंभीर लक्षणे दिसण्याचा धोका कमी होऊ शकतो. कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी, कृपया लसीकरण न केलेल्या आणि लसीकरण न केलेल्या प्रवाशांसाठी सीडीसीच्या विशिष्ट शिफारसींचा विचार करा", असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT