राष्ट्रीय

Donate For Desh : काँग्रेसच्या देणगी मोहिमेत कोडचा घोळ

मोहन कारंडे

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या 'डोनेट फॉर देश' या देणगी मोहिमेत क्यूआर कोडसंबंधी झालेल्या गोंधळाची गंभीर दखल पक्षनेतृत्वाने घेतली आहे. देणगी मोहिमेसाठी पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला क्यूआर कोड काही ठिकाणी चुकीचा छापला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी एक अंतर्गत समिती नेमण्याच्या आणि जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याच्या सूचना पक्षनेतृत्वाने दिल्याचे समजते.

वादग्रस्त क्यूआर कोड बुधवारी (10 जानेवारी) समोर आला होता. काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यात राहुल गांधी यांच्या दौर्‍याबद्दल आणि पक्षाच्या देणगी मोहिमेविषयीचे एक पत्रक प्रसिद्ध केले होते. यावरील संकेतस्थळ आणि क्यूआर कोड चुकीचा प्रकाशित करण्यात आला होता. काँग्रेसने जारी केलेल्या पत्रकामध्ये क्यूआर कोडशी संलग्न केलेले संकेतस्थळ donateinc.co.in. हे आहे. याच संकेतस्थळाचा उल्लेख  पत्रकावरही आहे, तर काँग्रेसला देणगी देण्याचे खरे संकेतस्थळ donateinc.in हे आहे. दरम्यान, चुकीच्या संकेतस्थळामुळे काँग्रेसला दिलेल्या लाखो रुपयांच्या देणग्या बुधवारी चुकीच्या खात्यात पोहोचल्याचे समजते. दरम्यान, 14 जानेवारीपासून मणिपूरमधून सुरु होत असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या गीताचे शुक्रवारी प्रकाशन करण्यात आले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT