कानपूर : पुढारी ऑनलाईन
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कानपूरच्या शुभव व्दिवेदीच्या घरी जेंव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पोहोचले, तेंव्हा या ठिकाणचे वातावरण एकदम भावूक झाले. शुभमच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरूवारी भेट घेतली, तेंव्हा सर्वांचे डोळे पाणावले.
शुभमची पत्नी ऐशान्याने जसे मुख्यमंत्री योगी यांना पाहिले तेंव्हा त्यांच्या अश्रुंना बांध फुटला. कापत्या स्वरात त्यांनी योगींना फक्त एकच म्हटले आम्हाला बदला पाहिजे. त्यावेळी योगी आदित्यनाथही भावूक झाल्याचे पाहायाला मिळाले. शुभच्या वडिलांनी त्यांच्या मुलाची दहशतवाद्यांनी कशी हत्या घडवली हे सांगितले तेंव्हा योगी यांनी त्यांना धीर दिला. यावेळी येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. योगिंनी यावेळी शक्य ती सर्व मदत करण्याचा भरोसा दिला.
या पीडित कुटुंबाची भेट घेवून बाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भावूक झाल्याचे दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ते आपले डोळे पुसत असल्याचे दिसून येत आहे.
कानपूरमध्ये शुभव व्दिवेदी यांचे गुरूवारी ड्योढी घाटावर हजारो लोकांच्या उपस्थितीत राजकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. कुटुंबियांचे सांत्वन करायला आलेल्या आदित्यनाथ यांनी सकाळी शुभमच्या हाथीपू (कानपूर) स्थित येथील घरी पोहोचले होते. या ठिकाणी त्यांनी शुभमच्या पार्थिव शरीराचे दर्शन घेउन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पहलगाममध्ये घडलेली दहशतवादाची क्रुर, बीभत्स आणि भ्याड घटना आहे. दहशतवादी शवेटचा श्वास घेत आहेत. पीडित कुटुंबियांसह राज्यातील तसेच देशातील लोकांना मी सांगू इच्छीतो की सरकार या दहशतवाद्यांबाबत झिरो टॉलरेंन्सची नितीचा अवलंब करणार आहे. ज्या लोकांनी ही घटना घडवली आहे त्यांना मुळासकट उखडून टाकण्यात येईल. जे लोक या षडयंत्राचा भाग आहेत त्यांनाही याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. पुढे ते म्हणाले की, ज्या पद्धतीने आमच्या हिंदू आई, बहिणींसमोर त्यांच्या कुंकवाची क्रुरपणे हत्या करण्यात आली, त्याच प्रकारे त्या दहशतवाद्यांच्या आकांनाही निश्चितच शिक्षा मिळणार आहे या विषयी कोणीही शंका ठेवू नये.
शुभमच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये कानपूरचा तरूण शुभम व्दिवेदीही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. हा दहशतवाद्यांचा बिभत्स आणि भ्याड हल्ला होता. अशा प्रकारच्या कृत्याचा फक्त भारतच नव्हे तर जगातील सर्व सभ्य समाजाने निंदाच केली आहे. निर्दोष पर्यटकांना त्यांची जात आणि धर्म विचारून हल्ला करण्यात आला आहे. आया बहिणींना त्यांच्यासमोर त्यांचे कुंकू पुसण्यात आले. हे कोणताही सभ्य समाज स्विकारणार नाही. भारत दहशतवाद्यांचे समुळ उच्चाटन करेल. दहशतवाद्यांबाबतीत झिरो टॉलरेन्स नितीचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे सर्वांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवावा.
शुभमचा मृतदेह बुधवारी रात्री लखनउ आणि रात्री उशिरा कानपूरला आणण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार शुभमवर राजकीय इतमामात अंत्य संस्कार करण्याची व्यवस्था करण्यात आली. योगी यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी शुभमचे वडिल आणि त्यांच्या पत्नीशीही बोलून घडलेली घटना जाणून घेतली. शुभमचे दोन महिण्यापूर्वीच लग्न झाले होते.