पहलगाम हल्‍ल्‍यात सहभागी दहशतवाद्याचे घर सुरक्षा दलांनी बॉम्‍बने उडवले, दुसऱ्याचे घर बुलडोझरने केले उद्ध्वस्‍त

Pahalgam Terror Attack : भारतीय सैन्याची जोरदार कारवाई....
Pahalgam Terror Attack
पहलगाम हल्‍ल्‍यात सहभागी दहशतवाद्याचे घर सुरक्षा दलांनी बॉम्‍बने उडवलेFile Photo
Published on
Updated on

जम्‍मू काश्मीर : पुढारी ऑनलाईन

पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यात २६ निष्‍पाप लोक मारले गेले. ज्‍यामध्ये अधिकतर लोक हे पर्यटक होते. जे जम्‍मू काश्मीरमधील पहलगाम येथे देशाच्या विविध राज्‍यांमधून पर्यटनासाठी आले होते.

Pahalgam Terror Attack
जम्मू-काश्मीरमध्ये अद्यापही 58 दहशतवादी सक्रिय!

सैन्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्‍ल्‍यात लश्कर-ए-तैयबाच्या ४ दहशतवाद्यांनी २ स्‍थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने ही घटना घडवली होती. जम्‍मू-काश्मीर प्रशासनाने पहलगाम प्रकरणातील सहभागी स्‍थानिक दहशतवादी आदिल शेखचे त्राल येथील घर बुलडोझरच्या साहाय्याने पाडले. तेच अनंतनाग जिल्‍ह्यातील बिजबेहराच्या गोरी परिसरात स्‍थित अन्य एका दहशतवाद्याचे घर बॉम्‍बने उडवून देण्यात आले आहे.

गुरी बिजबेहराच्या आदिल थोकर उर्फ आदिल गुरीवर दहशतवाद्यांना पहलगामच्या बैसरन येथील खोऱ्यात २२ एप्रिल रोजी हल्‍ला करण्याची योजना आखणे त्‍याला मूर्त स्‍वरूप देणे. त्‍यासाठी पाकिस्‍तानी दहशतवाद्यांना मदत करण्याचा त्‍याच्यावर आरोप आहे.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack | LoC वर तणाव वाढला! पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार, भारताकडून चोख प्रत्युत्तर

या दहशतवादी हल्‍ल्‍यात निष्‍पाप २६ लोक मारले गेले. ज्‍यामध्ये अधिकतर लोक हे पर्यटक होते. जे भारताच्या वेगवेगळ्या राज्‍यातून जम्‍मूमध्ये आले होते. सैन्य सुत्रांच्या माहितीनुसार, आदिल शेख याने २०१८ मध्ये अटारी-वाघा बॉर्डर व्दारे वैध पद्धतीने पाकिस्‍तानला गेला होता. तेथे पाकिस्तानमधील वास्तव्यादरम्यान, त्याने एका दहशतवादी छावणीत प्रशिक्षण घेतले आणि गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरला परतला.

दरम्‍यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पाकिस्तानी सैन्याने रात्रभर नियंत्रण रेषेवरील (LoC) अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार केला. पण या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारताच्या बाजूने कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

"पाकिस्तानी सैन्याने सीमेवर रात्रभर गोळीबार केला. भारतीय जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही," अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. फेब्रुवारी महिन्यातदेखील पाकिस्तानी सैन्याने पूंछ जिल्ह्यातील एलओसीवर भारतीय चौकीवर छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला होता. त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news