CJP on INDIA bloc's rally : 'कॉकरोच जनता पार्टी'चे (Cockroach Janata Party) संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक अभिजीत दीपके यांनी शनिवारी (३१ ऑक्टोबर) तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या दिल्लीत आज होणार्या रामलीला मैदानावर होणाऱ्या 'व्होट बचाव, देश बचाव' आंदोलनास पाठिंबा दिला. मात्र इतर राजकीय पक्षांसोबत मुख्य मंचावर उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले.
ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, "ममता बॅनर्जी यांची भेट तृणमूल आभार मानण्यासाठी होती. आम्ही 'नीट' (NEET) पेपर फुटीच्या विरोधात जंतरमंतरवर पहिले आंदोलन केले होते, तेव्हा त्यांनी तरुणांना पाठिंबा दिला होता. तसेच दिल्ली पोलिसांनी सौरव दास आणि आशुतोष रांका यांना अटक केली होती, तेव्हाही ममता बॅनर्जी यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता."
रामलीला मैदानावर होणाऱ्या रॅलीत सीजेपीच्या सहभागाबाबत विचारलेल्या प्रश्नावर दीपके म्हणाले, "आम्ही रविवारी दिल्लात होणार्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देतो. त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. मात्र, 'कॉकरोच जनता पार्टी' ही एक स्वतंत्र संघटना आणि निष्पक्ष व्यासपीठ आहे, आणि आम्ही ती तशीच ठेवणार असल्याचेही दीपके यांनी स्पष्ट केले.
'मत चोरी'च्या विरोधात लढणाऱ्या प्रत्येक गट आणि घटकाला सीजेपी पाठिंबा देईल. सीजेपी या चळवळीची सूत्रधार आहे. मला त्यांचा अभिमान आहे, अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जी यांनी सीजेपीचे कौतूक केले. आम्ही रविवारी होणार्या दिल्लीत होणार्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. यावेळी ममता बॅनर्जी यांनी दीपक आणि सीजेपी टीमला पश्चिम बंगालमध्ये येण्याचे आणि तिथे आपले कार्यक्रम आयोजित करण्याचे निमंत्रणही दिले.
इंडिया आघाडीच्या वतीने आज (दि. १. नोव्हेंबर) दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या इंडिया आघाडीच्या वतीने 'व्होट बचाव, देश बचाव' आंदोलन केले. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा देण्याच्या आघाडीची प्रमुख मागणी आहे.