CJP Delhi Protest Food Order pudhari
राष्ट्रीय

CJP Delhi Protest Food Order: बांगलादेश, कतार अन् दुबई... एकाने पाठवले तब्बल २००० पार्सल; जंतर मंतरवर परदेशातूनही ऑर्डर

Anirudha Sankpal

CJP Delhi Protest Food Order: जंतर मंतरवर जवळपास एका महिन्यापासून कॉक्रोज जनता पार्टीने नीट परीक्षा पेपर फुटीविरूद्ध आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनादरम्यान, सोनम वांगचुक देखील उपोषणाला बसले होते. ज्यावेळी त्यांना सरकारने बळजबरीने रूग्णालयात दाखल केलं त्यावेळी आंदोलनाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळू लागलं.

आंदोलनात मोठी गर्दी

दुसरीकडं विरोधी पक्षाचे नेते आणि सेलिब्रेटी देखील या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांच्या शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसले. या आंदोलनात १८ जुलैपासून मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. जे लोक दिल्लीत आंदोलनस्थळी पोहचू शकत नाहीत त्यांनी जे तिथं आंदोलन करत आहेत त्यांची खाण्या पिण्याची सोय बघत आहेत. अनेक लोकं देशाच्या काना कोपऱ्यातून स्विगी झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करून पाठवत आहेत. आता परदेशातून देखील आंदोलक विद्यार्थ्यांसाठी खाण्या पिण्याच्या वस्तू पाठवल्या जात आहेत.

जास्त जेवण पाठवू नका

जंतर मंतरवर पुन्हा एकदा अनेक डिलिव्हरी पर्सन जेवण घेऊन पोहचत आहेत. बुक करणाऱ्या अॅड्रेसमध्ये जंतर मंतर लिहिलेलं असतं. आणि जो ही डिलिव्हरी पोहचवणार आहे त्याला जो कोणी जंतर मंतरवर मिळेल त्याला हे जेवण द्या अशी सुचना करत आहेत. आता तर जंतर मंतरवर जास्त जेवण पाठवू नका अशी पोस्ट कॉक्रोज जनता पार्टीला करावी लागली आहे.

परदेशातून देखील आलं जेवण

देशातील कानाकोपऱ्यातून जंतर मंतरवरवरील आंदोलकांसाठी जेवण पोहचत आहे. त्याचबरोबर काही व्हिडिओ असे देखील व्हायरल झाले आहेत जिथं डिलिव्हरी बॉय जेवण कोणत्या ठिकाणावरून ऑर्डर केलं आहे असं विचारल्यावर ते बांगलादेश, दुबई आणि कतार अशा देशांची नावे घेत आहेत.

न्यूज एजन्सी आयएनएएसने एका डिलिव्हरी बॉयशी संवाद साधला त्यावेळी त्याने ही ऑर्डर कतारवरून आळ्याचं सांगितलं. कतारवरून फोन आला होता. त्याने जंतर मंतरवर कोणत्याही विद्यार्थ्याला हे जेवण दे असं सांगितलं. डिलिव्हरी बॉयने सांगितलं की आमच्याकडे अशा अनेक ऑर्डर्स आहे. कोणी मुंबईतून करतं कोणी कोलकात्यातून करतं. ऑर्डर करणारे कुठूनही करतात.

एका व्यक्तीकडून २००० ऑर्डर

एका आंदोलनकर्त्याने युट्यूब चॅनलला सांगितलं की परदेशातून देखील मोठ्या प्रमाणात जेवणाच्या ऑर्डर केल्या जात आहेत. दुबईतील कोणी एका व्यक्तीने २००० लोकांसाठी जेवणाची ऑर्डर केली होती. आंदोलनकर्ता म्हणाला की, काल कोणी तरी ८ वेळा एकूण २००० पार्सल पाठवले.

एका डिलिव्हरी बॉयला या जेवणाची ऑर्डर कुठून आली आहे असं विचारलं त्यावेळी त्याने याची ऑर्डर बांगलादेशमधून आली आहे. आता विदेशात राहणारे भारतीय हे जेवण पाठवत आहे की तिथले नागरिक पाठवत आहे हे स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT