राष्ट्रीय

Charanjit Singh Channi : पंजाबच्या नव्या ‘कॅप्टन’चा शपथविधी; काँग्रेसने एका दगडात मारले तीन पक्षी!

backup backup

चंदीगड; पुढारी ऑनलाईन : Charanjit Singh Channi : पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून दलित शीख नेते चरणजीत सिंग चन्नी यांची नियुक्ती करून काँग्रेसने एका दगडात तीन पक्षी मारले आहेत. ते अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होते. चन्नी यांनी आज राज्याचे १६ वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ५८ वर्षीय चन्नी रूपनगरच्या चमकौर साहिबमधून तीन वेळा आमदार आहेत.

या पदावर पोहोचलेले ते राज्यातील पहिले दलित नेते आहेत. चन्नी हे अमरिंदर सिंग यांचे विरोधक मानले जातात. राहुल गांधीही त्यांच्या शपथविधीला उपस्थित होते.

काँग्रेसने तिहेरी जुगार खेळला

आगामी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी Charanjit Singh Channi चन्नी यांना मुख्यमंत्री करून काँग्रेसने तिहेरी जुगार खेळला आहे. सर्वप्रथम, त्यांनी दलित समाजातून मुख्यमंत्री बनवून त्या व्होट बँकेकडे मोर्चा वळवला आहे.

पंजाबमध्ये सुमारे ३२ टक्के लोकसंख्या आहे आणि दुसरे म्हणजे, याद्वारे काँग्रेसने विरोधी भाजप आणि अकाली दलाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तिसरे म्हणजे 'आप'ला उत्तर देताना, पक्षातही सत्तेचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.

वास्तविक, अकाली दलाने निवडणूक जिंकल्यास दलित नेत्याला उपमुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते, तर भाजपने निवडणूक जिंकल्यास दलित मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसने चन्नींच्या बहाण्याने दोन्ही पक्षांना धोबीपछाड दिली आहे.

पंजाबच्या इतिहासात दलित चेहरा मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यात फक्त जाट शीख मुख्यमंत्री बनले आहेत. जाट शीख लोकसंख्या राज्याच्या सुमारे ३० कोटी लोकसंख्येच्या २० टक्क्यांजवळ आहे.

एकही मुख्यमंत्री दलित समाजातून आलेला नाही

दलित लोकसंख्या (हिंदू आणि शीख दलित) ३२ टक्के आहे. राज्यातील इतर हिंदू लोकसंख्या सुमारे ३८ टक्के आहे. या व्यतिरिक्त, इतर समुदाय ज्यात मुस्लिम, ख्रिश्चन यांचा समावेश आहे त्यांच्या लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के आहेत.

स्वातंत्र्यानंतर राज्यात १५ पैकी एकही मुख्यमंत्री दलित समाजातून आलेला नाही. 1966 मध्ये राज्याच्या विभाजनापूर्वी पंजाबचे तीन मुख्यमंत्री हिंदू वंशाचे होते.

तेव्हापासून, जवळजवळ सर्व मुख्यमंत्री (ग्यानी जेल सिंग वगळता) जाट शीख समाजातून आले आहेत, जे राज्याच्या लोकसंख्येच्या १९ टक्के आहे. १९७२ ते ११९७७ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री असलेले ग्यानी झैल सिंग हे ओबीसी समाजाच्या रामगढिया गटाशी संबंधित होते.

पंजाबच्या विधानसभेच्या एकूण ११७ जागांपैकी ३४ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. राज्यातील एक तृतीयांश दलित लोकसंख्या मालवा (दक्षिण-पूर्व भाग) आणि माढा भागात (अमृतसर, तरनतारन, गुरदासपूर आणि पठाणकोट) राहतात आणि त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

हे ही वाचलं का?

[visual_portfolio id="37589"]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT