CBSE 12th Result Controversy pudhari
राष्ट्रीय

CBSE 12th Result Controversy: ज्या वेदांतने CBSE ची पोलखोल केली.. त्याला श्रीवास्तवांनी दिला पाकिस्तानी अँगल, नंतर मागितली माफी

Anirudha Sankpal

CBSE 12th Result Controversy: बारावीत शिकणाऱ्या वेदान्त श्रीवास्तव या विद्यार्थ्याने१२ वी CBSE परीक्षेत फिजिक्सच्या पेपरमध्ये झालेला गोंधळ सर्वांसमोर आणला होता. त्यानंतर वेदांतला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला. एवढंच काय तर पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी देखील वेदांतचे ट्विट देशाच्या बाहेरून केले असल्याचे दिसून येत आहे असे म्हणत सोशल मीडियावरील ट्रोलिंगला एक लेजिटिमेसी देण्याच्या प्रयत्न केला. मात्र आता त्याने ट्विट करून माफीनाम्यासह लोटांगण घातलं आहे.

OSM मुल्यांकन व्यवस्था वादात

जेव्हापासून सीबीएसईने १२ वीचे निकाल जाहीर केले आहेत तेव्हापासून OSM वर आधारीत मुल्यांकन व्यवस्थेवर टीका होत आहे. १२ वीचा एकूण निकाल हा ३.१९ टक्क्यांनी घटला आहे. मात्र टीकेनंतर बोर्डाने विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तर पत्रिकेची स्कॅन कॉपी उपलब्ध कलून दिली आहे.

अनेक विद्यार्थ्यांनी सीबीएसईने जी उत्तर पत्रिकेची स्कॅन कॉपी दिली आहे त्याचे हस्ताक्षर आमच्या हस्ताक्षराशी जुळत नाही असा आरोप केला आहे.

काय आहे वेदांत श्रीवास्तव प्रकरण?

दिल्लीचा वेदांतने १९ मे रोजी त्याला फिजिक्सच्या पेपरमध्ये अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क मिळाल्यानंतर स्कॅन कॉपीची मागणी केली होती. त्याला २३ मे रोजी ही स्कॅन कॉपी मिळाली. मात्र सीबीएसईने ज्या फिजिक्सच्या उत्तर पत्रिकेची स्कॅन कॉपी दिली होती. त्याचा रोल नंबरच मॅच होत नव्हता.

त्याने ट्विटरवर याबाबतची पोस्ट केली. त्याचबरोबर त्याने इंग्लिश आणि कॉम्प्युटर सायन्सच्या पेपरची स्कॅन कॉपी देखील जोडली होती. त्यावे ट्विट केले की, 'मी वर्षभर अभ्यास केला. मी माझी झोप, मानसिक शांतता, आऊटिंग सर्व काही या परीक्षेसाठी कुरबान केलं. आता मला माझा फिजिक्सचा पेपर तपासला गेला आहे की नाही हेच माहिती नाही.'

ट्रोलर्सना पत्रकाराचीही साथ

यानंतर सोमवारी सायंकाळपर्यंत वेदांतची ही पोस्ट सुमारे ४० लाख रोलांनी पाहिली. सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर लगेचच ट्रोल आर्मी त्याच्या मागे लागली. ट्रोलर्सनी असभ्य भाषेत त्याला शिव्या देत संस्कारांची रांगोळी सोशल मीडियावर घालायला सुरूवात केली.

त्याचे एक्स हँडल हे साऊथ एशियामधील लोकेशन दाखवत होते. त्यानंतर त्याला अँटी नॅशनल आणि पाकिस्तानी म्हणण्यात आलं. याला सरकारी न्यूज चॅनलचे कथित वरिष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनी देखील ट्विट करून एक लेजिटिमसी देण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर आपली चूक लक्षात आल्यावर त्यांनी वेदांत आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागत विषय संपवण्याचा करण्याचा प्रयत्न केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT