NEET Paper Leak Nashik Connection | नीट पेपरफुटीचे 'नाशिक कनेक्शन' उघड! पाथर्डी फाटा परिसरातून शुभम खैरनारला अटक

NEET Paper Leak Nashik Connection | वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाला अटक; राज्य गुन्हे शाखेची संयुक्त पथके नाशिकमध्ये दाखल
NEET Paper Leak Nashik Connection
NEET Paper Leak Nashik Connection File Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वैद्यकीय प्रवेशासाठी ३ मे रोजी 3 झालेल्या 'नीट' परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात आता नाशिक कनेक्शन समोर ३ आले असून, तपास यंत्रणांनी शहरातील पाथर्डी फाटा परिसरातून शुभम खैरनार या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. स्थानिक पोलिसांकडून त्याचा तावा सीबीआय पथकाकडे दिला जाणार आहे.

NEET Paper Leak Nashik Connection
Jal Jeevan Mission | मनखेडमध्ये महिलांची पाण्यासाठी वणवण; हंडा मोर्चाचा इशारा

सायंकाळी उशिरा सीबीआयचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले. गुन्हेशाखेच्या . युनिट दोनमध्ये शुभम खैरनारची चौकशी नं सुरू आहे. या प्रकरणात देशभरातून व आतापर्यंत १६ जणांना, तर महाराष्ट्रातून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विद्याथ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीवर

पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य पुन्हा टांगणीला लागले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी कारवाई अधिक तीव्र केली आहे.

संशयित शुभम खैरनार 'बीएचएमएस'चा विद्यार्थी

'नीट' पेपरफुटी प्रकरणातील संशयित शुभम खैरनार हा बीएचएमएसचा विद्यार्थी असल्याचे समजते. तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील आहे. मेडिकल कौन्सिलिंगची एजन्सी तो चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. या माध्यमातून पेपरविक्री केली जात असल्याचा संशय पोलिस यंत्रणांना आहे.

NEET Paper Leak Nashik Connection
Instagram Fraud Case | मैत्रीला काळिमा! इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून 14 वर्षीय मैत्रिणीला 15 लाखांना लुटले

सीबीआय पथकाकडून चौकशी सुरू

पेपरफुटी प्रकरणात केंद्र सरकारने सीबीआय चौकशी सुरू केली असून, या प्रकरणात नाशिक येथे अटक केलेल्या शुभम खैरनार याच्या चौकशीसाठी तत्काळ सीबीआयचे एक पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. या पथकाकडून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ कार्यालयात संशयित खखैरनार याची चौकशीदेखील सुरू केली आहे.

चार नामांकित क्लासेस रडारवर

नाशिकमधील चार नामांकित कोचिंग क्लासेसही तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. या क्लासेसमधील काही कर्मचारी, समन्वयक आणि विद्यार्थ्यांच्या संपर्काची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि संगणकीय डेटा तपासला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य गुन्हे शाखेची संयुक्त पथके नाशिकमध्ये दाखल झाली असून, शहरातील काही ठिकाणी गुप्त चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

नीट पेपरमधील काही प्रश्न फुटले असल्याची कबुली राष्ट्रीय चाचणी संस्थे (एनटीए) चे महासंचालक अभिषेक सिंह यांनी मंगळवारी दिली. मात्र, पूर्ण पेपर फुटला नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. परीक्षा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वीच एका व्यक्तीला व्हॉटस्अॅपवर एक संदेश प्राप्त झाला होता. यामध्ये असलेले काही प्रश्न परीक्षेतील मूळ प्रश्नांशी तंतोतंत जुळत होते, अशी माहिती समोर आली आहे.

'नीट- यूजी २०२६' परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील तब्बल २२ लाख विद्यार्थ्यांनी ३ मे रोजी ही परीक्षा दिली होती, तर महाराष्ट्रातून सुमारे अडीच लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला असून, पालकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रातही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर्षभर कठोर परिश्रम घेत अभ्यास केला होता. मात्र, पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन वे बिघडल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. 'विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, लाखो रुपये क्लासेसवर खर्च होतात आणि शेवटी पेपर फुटतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे,' अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली. ब्त र काही पालकांनी परीक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'इतक्या तमोठ्या राष्ट्रीय परीक्षेची गोपनीयता जपण्यात यंत्रणा अपयशी ठरत असेल, तर शासनाचे ने नियंत्रण उरले आहे का?' असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

सीकरमधून पहिली तक्रार; गेस पेपरमधील ४१० प्रश्नांपैकी १२० प्रश्न जसेच्या तसेच

सीकर (राजस्थान) येथून पेपरफुटीच्या तक्रारी आल्या. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) कडे सोपवली होती. त्याच्या सखोल तपासानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या. 'एसओजी 'ने केलेल्या तपासानुसार, सीकरमध्ये परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ७२० पैकी तब्बल ६०० गुणांचे प्रश्न असलेले हस्तलिखित संच मिळाले होते. या १५० पानांच्या प्रश्नपेढी (क्वेश्चन बँक) त भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचे ४१० प्रश्न होते. त्यापैकी १२० प्रश्न ३ मे रोजीच्या परीक्षेत जसेच्या पतसे आले होते. 'एनटीए'ला असेही आढळले की, ही 'प्रश्नपेढी' परीक्षेच्या जवळपास एक महिना आधीच जयपूर, सीकर, येथील विद्यार्थ्यांमध्ये फिरत होती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news