Mamata Banerjee TMC Bank Accounts pudhari
राष्ट्रीय

Mamata Banerjee TMC Bank Accounts: ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा... तीनही बँक खाती वापरण्याची दिली परवानगी

Anirudha Sankpal

Mamata Banerjee TMC Bank Accounts: कोलकाता उच्च न्यायालायने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC) ला एक मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने पक्षाच्या दैनंदिन कामांसाठी आणि खर्चांसाठी त्यांच्या तीन बँक खांत्यांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. नुकतेच ही तीन बँक खात्याचे डेबिट फ्रीज करण्यात आले होते.

जरी ममतांच्या पक्षाला बँक खाती वापरण्याची परवानगी दिली असली तरी याचे संचालन न्यायालयाद्वारे नियुक्त एक विशेष अधिकारी याच्यावर कडक नजर ठेवणार आहे. उच्च न्यायालयाच्या जस्टिस सौगत भट्टाचार्य यांच्या पीठानं हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने पोलिसांकडून एवढ्या गडबडीत बँक खाते सील करण्याच्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती

तृणमूल काँग्रेसच्या बँक खात्यातील व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी माजी न्यायाधीश जस्टिस सुब्रत तालुकदार यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू असणार आहे. या दरम्यान, पक्ष केवळ आपल्या दैनंदिन खर्चासाठी आणि कर्माचाऱ्यांचे पराग देण्यासाठी या खात्यातून रक्कम काढू शकतो. या खात्यातून कोणत्याही मोठ्या आर्थिक देवाण घेवाणीला परवानगी नाहीये. विशेष अधिकाऱ्याला १.२५ लाख रूपये मानधन देण्यात येईल. हे मानधन ममता बॅनर्जी गटाद्वारे केले जाणार आहे.

पोलिसांनी घाई गडबड केली

दरम्यान, सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने बिधानगर पोलिसांकडून कारवाईची गडबड केली. तसेच कारवाईच्या टायमिंगवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कोर्टाने त्यांची कारवाई योग्य आहे हे ठरवण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीयेत. एफआयआरच्या एका दिवसात बँक खाती फ्रीज का करण्यात आली.

अभिषेक मनु सिंघवींनी केला युक्तीवाद

टीएमसीकडून वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी उच्च न्यायालयात युक्तीवाद केला. असे अचानक एका मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची बँक खाती गोठवल्यामुळं त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.

ही कारवाई संविधानच्या कलम १९(१) (a) आणि १९(१) (d) चे उल्लंघन असून लोकशाहीत समान संधी यामुळं संपुष्टात येत आहे. झालेली तक्रार ही पूर्णपणे अस्पष्ट असून एफआयआर दाखल होण्याच्या दुसऱ्याच दिवशी टीएमसीची बॅक खाती गोठवणे दुर्दैवी असल्याचा युक्तीवाद करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT