Nashik Petrol Pump Cyber Fraud | डिजिटल चोरांचा आता नवा फंडा; फ्रॉडची रक्कम पेट्रोलपंपांच्या खात्यात

Nashik Petrol Pump Cyber Fraud | ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी नवा फंडा अवलंबल्याचे समोर आले आहे.
Petrol Pump News
Iran America war crisis | सामान्य पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ नाही: केंद्र सरकारची माहिती, प्रीमियम पेट्रोल मात्र महागFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी नवा फंडा अवलंबल्याचे समोर आले आहे. डिजिटल फ्रॉडमधून लुटलेली रक्कम थेट शहरातील नामांकित व्यावसायिक आणि पेट्रोलपंपांच्या बँक खात्यांमध्ये जमा करून त्या बदल्यात रोख रक्कम उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Petrol Pump News
Ratnagiri online fraud case | संगमेश्वरमध्ये इंजिनिअर तरुणाची सव्वा दोन लाखांची ऑनलाईन फसवणूक

सायबर गुन्हेगारांकडून सध्या 'किराया खाते' या नव्या पद्धतीचाही वापर वाढला आहे. यात बँक खातेधारकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांची खाती भाड्याने घेतली जातात. त्यानंतर ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवून ती रोख स्वरूपात काढली जाते. त्यामुळे खातेदार नकळत सायबर गुन्ह्यात अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हॅकरच्या संपर्कात असलेल्या एका संशयिताची ओळख पटली असून, त्याच्याविरोधात मुंबई सायबर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तपासादरम्यान संशयिताने शहरातील तीन पेट्रोलपंपांवर सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम रोख स्वरूपात घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

Petrol Pump News
Bank Account Freeze Cyber Crime: सायबर गुन्ह्यांच्या तपासात बँक खाती फ्रीज; नागरिकांना आर्थिक त्रास

सायबर पोलिसांनी नागरिकांना आपली बँक खाती, एटीएम कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआय सुविधा इतरांच्या वापरासाठी देऊ नयेत, तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहारांची त्वरित माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे 'किराया खाता' ?

  • ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम ज्या बँक खात्यावर जमा केली जाते, ते खाते भाडेतत्त्वावर घेतलेले असते.

  • अशा खात्यांना सायबर गुन्हेगारांच्या भाषेत 'किराया खाता' म्हटले जाते.

  • सायबर फसवणुकीत या खात्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news