राष्ट्रीय

ताजमहालातील २० बंद खोल्या खुल्या कराव्यात

अनुराधा कोरवी

आग्रा : वृत्तसंस्था :  ताजमहालातील बंद असलेल्या २० खोल्या खुल्या करून तेथे हिंदू मूर्ती वा शिलालेख आहेत किंवा कसे, त्याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका भाजपच्या अयोध्या शाखेचे प्रसिद्धीप्रमुख डॉ. रजनीश सिंह यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

याचिकेत ताजमहाल हा 'तेजोमहालय' असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सत्य काय ते समोर यावे म्हणून सरकारला समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. ताजमहाल परिसराचे सर्वेक्षण आवश्यक आहे. यातूनच वास्तव काय ते समोर येईल. याचिकेत काही इतिहासतज्ज्ञांचे संदर्भ दिले आहेत. पी. एन. ओक तसेच अन्य इतिहास तज्ज्ञांच्या मते, चार मजली ताजमहालातील बंद असलेल्या खोल्यांत शिव मंदिर आहे.

ताजमहाल हा 'तेजोमहालय' असल्याचा दावा वर्षानुवर्षे काही हिंदू संघटना करत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जगद‍्गुरू परमहंसाचार्यही ताजमहालात शिवपूजन करण्याच्या हट्टावर अडून बसले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि किठम येथील विश्रामगृहात नजरकैद केले होते. नंतर त्यांना पोलिसांनी अयोध्येत परत पाठविले होते. परमहंसाचार्यांनी तेव्हा या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT