राष्ट्रीय

Bharat Biotech चा भ्रष्टाचार आरोपानंतर ब्राझीलच्या दोन कंपन्यांसोबत करार रद्द

backup backup

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : Bharat Biotech : भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भारत बायोटेकने ब्राझीलच्या दोन भागीदारांशी कोव्हॅक्सिनसाठी केलेला करार रद्द केला आहे. याबाबत पीटीआयने माहिती दिली आहे.

भारत बायोटेकने Bharat Biotech म्हटले आहे की, ब्राझीलच्या बाजारपेठेत कोव्हॅक्सिन या लसीसाठी प्रीसिसा मेडिसीमेंटोस आणि एन्व्हिक्सिया फार्मास्युटिकल्स एलएलसीबरोबर करार केलेला सामंजस्य करार रद्द केला आहे.

ब्राझिलियन सरकारसोबत २० मिलियन डोस पुरवण्याचा करार केल्याने ते वादात सापडले आणि तो चौकशीचा विषय झाला. या कारणास्तव सामंजस्य करार संपुष्टात आला.

ब्राझीलमधील प्रिसिसा मेडिसीमेंटोस भारत बायोटेकचा एक भागीदार आहे.

जो नियामक सबमिशन, परवाना, वितरण, विमा आणि फेज तीनच्या क्लिनिकल चाचण्या आयोजित करण्यासाठी सहाय्य, मार्गदर्शन आणि समर्थन प्रदान करतो.

कंपनीने तत्काळ प्रभावाने सामंजस्य करार संपुष्टात आणला आहे.

असे असूनही, भारत बायोटेक ब्राझीलच्या औषध नियामक संस्था ANVISA सोबत कोव्हॅक्सिनसाठी नियामक मान्यता प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करत राहील, असे कंपनीने सांगितले.

भारत बायोटेकला प्रत्येक देशात लागू असलेल्या कायदेशीर आवश्यकतांनुसार वेगवेगळ्या देशांमध्ये मान्यता मिळते.

ब्राझीलमध्ये कोव्हॅक्सिन नेण्याच्या उद्देशाने भारत बायोटेकने २० नोव्हेंबर रोजी प्रेसिसा मेडिसीमेंटोस आणि एन्व्हिक्सिया फार्मास्युटिकल्स एलएलसी यांच्याशी सामंजस्य करार केला होता.

भारत बायोटेक म्हणाले की, या लसीची जागतिक किंमत १५ ते २० डॉलर्स दरम्यान निश्चित केली गेली आहे.  त्यानुसार ब्राझीलच्या सरकारला प्रति डोस १५ अमेरिकन डॉलर्सला डोस देण्यात आला.

कंपनीने म्हटले आहे की, आपल्याला कोणतीही आगाऊ रक्कम मिळाली नाही किंवा ब्राझीलमधील आरोग्य मंत्रालयाला कोणतीही लस पुरविली गेली नाही.

हेे ही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT