Vikravandi assembly bypoll
तामिळनाडूतील विक्रवंडी येथे मतदान संपल्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सील केली. ANI Photo
राष्ट्रीय

Assembly By-Election | विधानसभा पोटनिवडणूक : विक्रवंडीत सर्वाधिक, बद्रीनाथमध्ये कमी मतदान

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहारसह ७ राज्यात विधानसभेच्या १३ जागांवर आज पोटनिवडणूक पार प़डली. यामध्ये सर्वाधित ७७.७३ % मतदान तामिळनाडूमधील विक्रवंडी मतदारसंघात झाले तर सर्वात कमी ४७.६८ % मतदान उत्तराखंडमधील बद्रीनाथ मतदारसंघात झाले. आज निवडणूक पार पडलेल्या सर्व १३ विधानसभेच्या जागांचा निकाल १३ जुलै रोजी जाहीर होणार आहेत. १३ पैकी १० जागा आमदारांच्या राजीनाम्यामुळे तर ३ जागा विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झाल्या होत्या.

Summary

  • ७ राज्यातील विधानसभेच्या १३ जागांवर पोटनिवडणूक

  • तामिळनाडूमधील विक्रवंडी मतदारसंघात सर्वाधित ७७.७३ % मतदान

  • उत्तराखंडमधील बद्रीनाथ मतदारसंघात सर्वात कमी ४७.६८ % मतदान

कोणत्या राज्यातील कोणत्या मतदारसंघात पोटनिवडणूक?

पश्चिम बंगालमध्ये रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला या ४ जागांवर पोटनिवडणूक झाली. उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर तर पंजाबमधील जालंधर पश्चिम मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडली. हिमाचल प्रदेशातील डेहरा, हमीरपूर आणि नालागढ मतदारसंघात, बिहारमधील रुपौली मतदारसंघात, तामिळनाडूमधील विक्रवंडी आणि मध्य प्रदेशातील अमरवाडा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडली.

विविध राज्यातील मतदारसंघात मतदानाची टक्केवारी

राज्य - पश्चिम बंगाल

१) रायगंज ६६.१२ %

२) राणाघाट दक्षिण ६५.३७ %

३) बागडा ६५.१५ %

४) माणिकतला ५१.३९ %

राज्य - उत्तराखंड

१) बद्रीनाथ ४७.६८ %

२) मंगलोर ६७.२८ %

राज्य – पंजाब

१) जालंधर पश्चिम ५१.३० %

राज्य – हिमाचल प्रदेश

१) डेहरा ६३.८९ %

२) हमीरपूर ६५.७८ %

३) नालागढ ७५.२२ %

राज्य – बिहार

१) रुपौली ५१.१४ %

राज्य – तामिळनाडू

१) विक्रवंडी ७७.७३ %

राज्य – मध्य प्रदेश

१) अमरवाडा ७२.८९ %

SCROLL FOR NEXT