Massoud Pezeshkian Iran News President | इराणला मिळाले नवीन राष्ट्राध्यक्ष, 'मसूद पेझेश्कियान' यांनी निवडणूक जिंकली

मसूद पेझेश्कियान बनले इराणचे १४ वे राष्ट्राध्यक्ष
Massoud Pezeshkian Iran News President
इराणला मिळाले नवीन राष्ट्राध्यक्ष

पुढारी ऑनलाईन डेस्क: ब्रिटनपाठोपाठ इराणमध्ये देखील सत्ताबदल झाला आहे. उदारमतवादी, सुधारणावादी नेते मसूद पेझेश्कियान यांनी निवडणूक जिंकली आहे. ते लवकरच इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. त्यांनी इराणमधील कट्टरपंथी नेते सईद जलिली यांचा पराभव केला आहे. इब्राहिम रायसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर इराणमध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. यापूर्वी फेब्रुवारी, २०२४ मध्ये इराणमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुक झाल्या होत्या.

मसूद पेझेश्कियान इराणचे १४ वे राष्ट्रपती

इराणमधील सुधारणावादी नेते मसूद पेझेश्कियान यांनी १४ व्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. मसूद पेझेश्कियान हे इराणचे माजी आरोग्य मंत्री आहेत. ते एक अनुभवी कायदेतज्ज्ञ आणि कार्डियाक सर्जन देखील आहेत. निवडणुकीपूर्वी राजकीय भाषणांमध्ये पेझेश्कियान यांनी हिजाब विरोधात आवाज उठवला. हाच निवडणुक प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला होता.

कट्टरवादी जलिल यांचा ३० लाख मतांनी पराभव

इराणचे राज्य माध्यम IRNA नुसार, मसूद पेझेश्कियान यांना १ कोटी ६४ हजार तर सईद जलिली यांना १ कोटी ३६ लाख मते मिळाली आहेत. या निवडणुकीत कट्टरवादी नेते जलिल यांचा जवळपास ३० लाख मतांनी पराभव झाला आहे.

इब्राहिम रायसी यांचा अपघाती मृत्यूनंतर पुन्हा निवडणूक

इराणचे राज्य माध्यम IRNA नुसार, मसूद पेझेश्कियान यांना १ कोटी ६४ हजार तर सईद जलिली यांना १ कोटी ३६ लाख मते मिळाली आहेत. या निवडणुकीत कट्टरवादी नेते जलिल यांचा जवळपास ३० लाख मतांनी पराभव झाला आहे. इराणमध्ये याचवर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणूक झाली होती. ज्यामध्ये इब्राहिम रायसी पुन्हा इराणचे राष्ट्रपती बनले. परंतु, त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याने इराणचे राष्ट्रपती पद रिकामे होते. त्यामुळे इराणमध्ये पुन्हा नव्याने निवडणुका लागल्या होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news