AAP MLA Join BJP | दिल्लीत 'आप'ला धक्का: आमदारासह नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत प्रवेश
AAP  MLA Join BJP
आपचे आमदार कर्तारसिंह तंवर, माजी मंत्री राज कुमार आनंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. BJP Delhi X Photo

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीच्या छत्तरपूर मतदारसंघाचे आम आदमी पक्षाचे आमदार कर्तारसिंह तंवर, दिल्लीचे माजी मंत्री राज कुमार आनंद यांच्यासह 'आप' नेत्यांनी बुधवारी (दि. १०) भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला.

AAP  MLA Join BJP
Sanjay Singh|अरविंद केजरीवाल तुरूंगात; संजय सिंह यांच्याकडे ‘आप’ची मोठी जबाबदारी

Summary

  • दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणनीती

  • त्यामुळे पक्षप्रवेशामुळे सत्ताधारी आपला मोठा धक्का

  • कर्तारसिंह तंवर यांचा २०१४ मध्ये भाजपमधून आपमध्ये प्रवेश

AAP  MLA Join BJP
‘आप’ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा : पक्ष कार्यालयाबाबत दिला ‘हा’ निर्णय

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणनीती आखायला सुरूवात झाल्यानंतर हा पक्षप्रवेश सत्ताधारी आम आदमी पक्षाला खिंडार पडल्य़ाचे मानले जात आहे. कर्तारसिंह तंवर यांनी २०१४ मध्ये भाजपमधून आपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २०१५ मध्ये ते छत्तरपूरमधून विजयी झाले. या जागेवरून दोन वेळा आमदार आहेत.

AAP  MLA Join BJP
RTE Row | अडीच लाख मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा; 'आप'चे आंदोलन

यावेळी उमेद सिंह फोगट, राज कुमार आनंद यांच्या पत्नी वीणा आनंद, सचिन राय आणि रत्नेश गुप्ता या नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news