Elon musk |अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक ! एलन मस्क पुन्हा 'EVM'वर बोलले

Elon musk On EVM
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक ! एलन मस्क पुन्हा 'EVM'वर बोललेPudhari

पुढारी ऑनलाईन डेस्क: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, टेस्ला, एक्स आणि स्पेस-एक्स या कंपन्यांचे सीईओ एलन मस्क यांनी पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा (EVM) मुद्दा उपस्थित केला आहे. मंगळवारी (दि.९ जुलै) त्यांनी या संदर्भातील 'X' पोस्ट केली. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी मस्क यांनी सलग दुसऱ्यांदा 'EVM'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

'EVM' ऐवजी 'कागदी मतपत्रिका' वापरा, मस्क यांचा सल्ला

एलन मस्क यांनी X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन' (EVM) आणि मेल (Mail) केलेली कोणतीही गोष्ट खूप धोकादायक आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये कागदी मतपत्रिका आणि वैयक्तिक मतदान यंत्रणेला प्राधान्य दिले पाहिजे', असे देखील मस्क म्हणाले. यासोबत मस्क यांनी अमेरिकेच्या वृत्तपत्रातील काही पुरावे देखील शेअर केले आहेत.

Elon musk On EVM
Elon Musk बनले १२ व्या मुलाचे बाप

'EVM हॅक होऊ शकते'; मस्क यांनी यापूर्वी केला होता दावा

यापूर्वी १५ जून रोजी उद्योगपती एलन मस्क यांनी 'इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन' (EVM) हॅक होऊ शकते, त्यामुळे ते काढून टाकले पाहिजेत, असा खळबळजनक दावा केला होता. एलन मस्क यांच्या 'या' विधानाचे पडसाद भारतात देखील उमटले होते. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन संदर्भातील मस्क यांचे विधान विरोधी पक्षनेत्यांनी उचलून धरत सत्ताधारी मोदी सरकारला धारेवर धरले होते.

Elon musk On EVM
Elon musk | EVM हॅक होऊ शकते, ते हटवले पाहिजे : मस्क यांचा खळबळजनक दावा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news