Asaduddin Owaisi love Advice pudhari
राष्ट्रीय

Asaduddin Owaisi love Advice: सकाळी, दुपारी अन् रात्री पत्नीला... असदुद्दीन ओवैसी प्रचार सभेत झाले 'लव्ह गुरू', Video व्हायरल

Anirudha Sankpal

Asaduddin Owaisi love Advice: उत्तर प्रदेशात सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील राजकारण तापलं असतानाच अन् एकमेकांवर शाब्दिक वार अन् पलटवार होत असतानाच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मात्र मंचावरून महोब्बत की दुकान उघडत, लव्ह गुरू स्टाईलमध्ये विवाहित पुरूषांना सल्ले दिले. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र त्यांनी जो सल्ला दिला आहे त्यावरून त्यांची स्तुती देखील होत आहे.

कानपूरमध्ये प्रेमळ सल्ला

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थितांना प्रेमाचा सल्ला दिला. ओवैसी यांनी पती - पत्नीच्या नात्यात प्रेम कायम टिकून रहावे यासाठी एक खास सल्ला दिला आहे. ओवैसी यांनी प्रचार सभेत उपस्थित असलेल्या लोकांना खास करून पुरूषांना आपल्या पत्नीवरील प्रेम व्यक्त करताना कंजुसी करू नका असा सल्ला दिला आहे.

पत्नीला दिवसातून ४-५ वेळा I Love You

त्यांनी सकाळी उठल्यावर, दुपारी आणि रात्री झोपताना दिवसातून चार-पाच वेळा तुम्ही तुमच्या पत्नीला आय लव्ह यू म्हणा असा सल्ला दिला. ओवैसी यांचा हा नवा अंदाज लोकांना चांगलाच भावला उपस्थितांकडूनही त्यांना चांगली दाद मिळाली. सोशल मीडियावर तर ओवैसी लव्ह गुरू झाल्याची चर्चा सुरू झाली.

उत्तर प्रदेशात निवडणुकीचं वारं

उत्तर प्रेदेशात २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी तिथलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ऑल इंडिया इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आघाडी करणाऱ्या राजकीय पक्षांना एक मोठी ऑफर दिली आहे.

ओवैसी म्हणाले की, 'त्यांच्या पक्षाला राज्यात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता यावी असं वाटत नाही. जर कोणता पक्ष भाजपला सत्तेत येण्यापासून रोखू इच्छितो तो पक्ष MIM शी चर्चा करू शकतो. कोणत्याही पक्षाला एकट्या जीवावर भाजपला हरवणे शक्य नाही. तो प्रयत्न अपुरा ठरेल.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT