Asaduddin Owaisi : देशात उच्च शिक्षित मुस्लिम मुलेच टार्गेट

निदा खान प्रकरणावरून खा. ओवैसींचा आरोप
AIMIM Maharashtra- Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisi : देशात उच्च शिक्षित मुस्लिम मुलेच टार्गेटfile photo
Published on
Updated on

Highly Educated Muslim Youth Targeted Across the Country

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या टीएसएस कंपनीने निदा खान ही कंपनीत एचआरमध्ये नव्हती, याबाबत अगोदरच खुलासा केला आहे. तिच्यावर केवळ धार्मिक भावना भडकावल्याचा गुन्हा दाखल आहे. यापूर्वीही दिल्लीत मुस्लिम तरुणांना मिर्झा गालिबची पुस्तक ठेवल्याने अटक केली होती. त्यामुळे देशात मुस्लिम समाजातील उच्च शिक्षित मुलांना टार्गेट केले जात आहे, असा आरोप निदा खान प्रकरणावर बोलताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी (दि. ९) केला.

AIMIM Maharashtra- Asaduddin Owaisi
Imtiaz Jaleel |इम्तियाज जलील यांना कचऱ्याच्या कंत्राटदाराला ब्लॅकमेल कराचे का?

राज्यातील सर्व एमआयएम नगर सेवकांची एसआयआरवर चर्चा करण्यासाठी हज हाऊसमध्ये शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ओवैसी यांनी एसआयआरसाठी जो पक्षाने ॲप तयार केला.

त्याबाबत माहिती दिली. त्याचवेळी पत्रकारांनी त्यांनी निदा खान प्रकरणात एमआयएमवर आरोप होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला. पत्रकारांकडून या प्रकरणावर एकाच वेळी प्रश्नांचा भडिमार झाल्याने खा. ओवैसी संतापले. ते म्हणाले या प्रकरणावरील सर्व प्रश्न एकदाच उपस्थित करा, पुन्हा, पुन्हा त्यावर भाष्य करणार नाही.

AIMIM Maharashtra- Asaduddin Owaisi
TCS Nashik Case: ..तर निदा खान पोलिसांना जाणार शरण !

खा. ही ओवैसी म्हणाले की, निदा खान सा प्रकरणावरून सध्या विविध पक्षांच्या अ नेत्यांकडून आरोपप्रत्यारोप होत असून नौ यात मीडिया ट्रायल केले जात आहे. हा प्रकार चुकीचा असून देशात निदा खान प्रकरण असो की, यापूर्वीचे दिल्लीत तरुणांना केलेल्या अटकेचा मुद्दा असो. हे सर्व प्रकरण मुस्लिम उच्च शिक्षित भा मुलांना टार्गेट करण्यासाठीच सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. निदा खान ही निर्दोष असून तिच्याकडे केवळ बुरखा, कुराण सापडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news