राष्ट्रीय

इतर पक्षांचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ६,३०० कोटी खर्च : केजरीवालांचा आरोप

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील इतर राजकीय पक्षांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने ६ हजार ३०० कोटी रुपये खर्च केले. हा खर्च केला नसता तर केंद्र सरकारला खाद्य सामुग्रीवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारावा लागला नसता,असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (दि. २७) केला.

नागरिक महागाईने त्रस्त असताना भाजप कोट्यवधी रुपये खर्च करून इतर राजकीय पक्षातील आमदारांची खरेदी करीत राज्यात सरकार पाडत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. दही, मध, गहू, तांदूळ इ. वर जीएसटी लावण्यात आला आहे, त्यामुळे सरकारी तिजोरीत वर्षाकाठी ७ हजार ५०० कोटी रुपये जमा होतील. सरकार पाडण्यासाठी आतापर्यंत भाजपने ६ हजार ३०० कोटी खर्च केले आहे. भाजपने सरकार पाडले नसते तर गहू, तांदूळ, छाछ इत्यादीवर जीएसटी लावावा लागला नसता. लोकांना महागाईचा सामना करावा लागला नसता, असे ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे.

अबकारी  धोरणाची अंमलबजावणीत कथितरित्या अनियमितते संदर्भात सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर भाजप आणि आप मधील संघर्ष तीव्र झाला आहे. शुक्रवारी विधानसभेत भाषण देताना केजरीवाल यांनी भाजपला राज्य सरकारांचे 'सिरीयल किलर' म्हणून संबोधित केले होते. पेट्रोल आणि डिझेल वरील मूल्यवाढ आणि जीएसटी मार्फत एकत्रित होणारी रक्कम आमदारांची खरेदी करण्यासाठी भाजप खर्च करते असा दावा देखील केजरीवाल यांनी केला होता.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT