करुणा मुंडेंची तीन व्यक्तींकडून तीस लाखाची फसवणूक | पुढारी

करुणा मुंडेंची तीन व्यक्तींकडून तीस लाखाची फसवणूक

संगमनेर पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्या बरोबर रहात असलेल्या एक तरुणी  व दोन तरूणांनी दामदुप्पट रक्कम देण्याचेआमिष दाखवून ३० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या तिघांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी असणा ऱ्या करुणा मुंडे यांची संगमनेर तालुक्यातील कोंची माची येथील रहिवासी असलेल्या भारत संभाजी भोसले आणि घुलेवाडी येथील रहि वासी असणाऱ्या, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग या तिघांबरोबर ओळख झाली.

त्यांना मुंडे यांनी आपल्या पक्षात सहभागी करून घेतले होते त्यामुळे त्यांची अन करुणा मुंडे यांची ओळख झाली होती.  या ओळखीतून विश्‍वास संपादन करीत त्या तिघांनी आपल्या लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनी बाबतची माहिती करुणा यांना दिली. तुम्ही जर आमच्या या कंपनीत पैसे गुंतवले तर तुम्हाला खूप फायदा होईल, तुम्ही जर मला ३० लाख रुपये दिले तर मी तुम्हाला कमीत कमी ४५ हजार ते ७० हजार रुपये महिन्याला नफा देईनच. यापेक्षा जास्त फायदा झाला तर तर त्याप्रमाणात तुम्हाला नफा देत जावू असे अमिष दाखवले. त्यांच्या म्हणण्यावर मुंडे यांनी विश्वास ठेवून वरील तिघांना १० दिवसात कॅश आणि चेक स्वरुपात असे एकूण ३० लाख रुपये दिले.

गुंतवणुकीनंतर मात्र या तिघांनी कोणतीही अधिक माहिती अन नफा न देता फेब्रुवारी 20 22 मध्ये त्यांची खात्री पटावी यासाठी 45 हजार रुपये परतावा दिला. त्यानंतर मात्र त्या तिघांनी  फोन न घेणे किंवा विचारलेल्या प्रश्नांबाबत उडवाउडवीची उत्तरे देणे असे प्रकार सुरु केले. तसेच मुंडे यांनी पैशांची मागणी केली असता मुंडे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची तसेच समाजात बदनामी कऱण्याची धमकी दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे मुंडे यांच्या लक्षात आले

करुणा मुंडे यांनी थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून योग्य त्या पुराव्यांसह फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांत भारत संभाजी भोसले (रा. तांबे वस्ती कोंची पोस्ट निमगाव जाळी), विद्या संतोष अभंग, व प्रथमेश संतोष अभंग रा घुले वाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत

Back to top button