'आप'चे भाजपविराेधात आंदाेलन: सिसोदिया यांच्याविराेधातील कारवाईचा तीव्र निषेध | पुढारी

'आप'चे भाजपविराेधात आंदाेलन: सिसोदिया यांच्याविराेधातील कारवाईचा तीव्र निषेध

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय तपास संस्था ‘सीबीआय’ने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी केलेल्या धाड कारवाईविरोधात आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. आज (दि. २७) सिसोदिया यांच्या निवासस्थानाबाहेर आप कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली.  या आंदाेलनामुळे दिल्‍लीत पुन्हा एकदा भाजप विरुद्ध आप संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

भाजप दबावतंत्राचा अवलंब करून आप आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. काही आमदारांना आर्थिक प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावासंबंधी नोटीस दिली. सोमवारी या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.यापूर्वीच भाजप ला घेरण्याची तयारी आपची आहे.

दिल्ली सचिवांच्या एका अहवलाच्या आधारे नायब राज्यपालांनी अबकारी धोरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची शिफारस केली होती. या प्रकरणी नायब राज्यपालांनी माजी अबकारी आयुक्तासह ११ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.  आता पुन्‍हा एकदा आप विरुद्ध नायब राज्यपाल असा संघर्ष होण्याची चर्चा हाेत आहे.

हेही वाचा 

Back to top button