राष्ट्रीय

संमतीशिवाय लिंग बदल शस्त्रक्रिया केल्याचा दावा; रुग्णालयाने हात झटकले

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्‍ये एक धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. एका २० वर्षीय तरुणाने आपल्या संमतीशिवाय  लिंग बदल ऑपरेशन केल्याचा दावा केला आहे. पण रुग्णालयाने संबधित तरुणाच्या संमतीने शस्त्रक्रिया केल्याचे म्हटले आहे.

माझ्या मनाविरुद्ध शस्त्रक्रिया 

माहितीनुसार उत्तरप्रदेशमधील २० वर्षीय तरुणाने दावा केला आहे की, ओमप्रकाश नावाच्या व्यक्तीने तीन जून रोजी रुग्णालयात घेवून गेला. त्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यात आले. तिथे त्याच्यावर लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यात आली.  दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला जाग आली तेव्हा त्याचे गुप्तांग कापलेले दिसले. तरुणाच्या या दाव्यानंतर रुग्णालयाने स्पष्ट केले आहे की, संबधित पीडित तरुणाच्या इच्छेने शस्त्रक्रिया केली गेली आहे.

तु आता एक स्त्री आहेस, माझ्याशी लग्न कर…

 पीडित तरुण म्हणाला,"जेव्हा मी जागा झालो, तेव्हा ओमप्रकाशने मला सांगितले तू आता एक स्त्री आहेस. आपण लग्न करण्यासाठी  लखनऊला जावू. मी विरोध केल्यास माझ्या वडिलांना मारण्याची धमकी दिली. पीडित तरुणाच्या  वडिलांनी १६ जून रोजी पोलिस स्टेशनला तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी ओमप्रकाशला अटक केली.

शेतकरी नेते श्याम पाल यांनी दावा केला आहे की, रुग्णालयातील डॉक्टर अवैध अवयवांच्या व्यापार रॅकेट चालवत आहेत. शरीरातील महत्वाचे अवयव काढून टाकतात आणि जास्त किंमतीला विकतात. पीडित व्यक्तीला आणि त्याच्या कुटूंबियांना  2 कोटी रुपयांची भरपाई रुग्णालयाने देण्यात यावी, अशीही मागणीही पाल यांनी सरकारकडे केली आहे.  या प्रकरणचा तपास सुरु असल्‍याचे . मुझफ्फरनगरमधील खतौली पोलीस अधिकारी रामशीश सिंह यांनी सांगितले.

रुग्णालयाने दावा नाकारला

मुख्य वैद्यकीय अधीक्षक कीर्ती गोस्वामी यांच्या म्हणण्यानुसार, पीडित तरुण दोन महिन्यांपासून प्लास्टिक सर्जन डॉ. रझा फारुकी यांना भेटण्यासाठी नियमितपणे रुग्णालयात येत होता. पुरुषाची ओळख एक महिला आहे आणि त्याला लिंग बदल शस्त्रक्रिया करायची होती. डॉ फारुकी यांनी पीडित तरुणाला त्याच्या मानसिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी दोन मनोचिकित्सकांकडे पाठवले, मानसिक स्थितीचे मूल्यांकन कायद्यानुसार लिंग-बदल शस्त्रक्रियापूर्वी आवश्यक असते. दोन मानसोपचार तज्ज्ञांनी तो मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त मानल्यानंतरच या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो चार  जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तर शस्त्रक्रिया सहा जून रोजी केली गेली. या सर्व प्रक्रिया कायदेशीर आहेत आणि डॉ. फारुकी यांच्या देखरेखीखाली केल्या गेल्या आहेत.

कीर्ती गोस्वामी यांनी असाही दावा केला की, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पीडित तरुणाचा ऑपरेशनपूर्वीचा  एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये तो त्याचे लिंग बदलण्यासाठी ऑपरेशन करण्याबद्दल बोलत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT