सांगली : लिंग बदल करून अश्‍विनीचा झाला ‘अंश’ | पुढारी

सांगली : लिंग बदल करून अश्‍विनीचा झाला ‘अंश’

कडेगाव : रजाअली पिरजादे
तोंडोली (ता. कडेगाव) येथील अश्‍विनी खलिपे या मुलीने आपले लिंग परिवर्तन करण्याचा मानस धरला आणि तो करूनही दाखवला. दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात लिंग बदल करण्यासाठी उपचार घेत असलेल्या अश्‍विनीवर पहिल्या टप्प्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अश्‍विनी हिने नाव बदलून आपले नवीन नाव ‘अंश’ असे ठेवले आहे.

अश्‍विनीची झाली अंश 

28 वर्षीय अश्‍विनीच्या हालचाली लहानपणापासूनच पुरुषाप्रमाणे होत्या. करारीपणा, निडरपणा, पोशाख या सर्व बाबतीत पुरुषाप्रमाणे तिचे वर्तन होते. लिंग परिवर्तनाच्या या धाडसी निर्णयाला तिच्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. काही महिन्यांपूर्वी गॅझेट करून अश्‍विनीनेे अंश खलिपे हे नाव धारण केले आहे.
अश्‍विनीची पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया 16 मार्च रोजी झाली. आता चार महिन्यांनी दुसर्‍या टप्प्यातील शस्त्रक्रिया होणार आहे. त्यानंतर तिसरी शस्त्रक्रिया होणार आहे. या तिन्ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर लिंग बदल करण्याचे सर्व उपचार यशस्वीपणे पूर्ण होतील. मागील वर्षभरापासून तिला लिंग परिवर्तनाची प्रतीक्षा होती. मात्र कोरोना संकटामुळे थोडासा उशीर झाला. आता मात्र पहिल्या टप्प्यातील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर दिलासा मिळाला आहे.

Back to top button