Dreamliner Crash PMO Investigation UPA Connection
नवी दिल्ली : १२ जून रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या झालेल्या विमान दुर्घनेचे आता राजकीय पडसाद उमटत आहेत. पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांनी स्वतः जातीने अहमदाबादेतील मेघाची नगर येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली व या घटनेची चौकशी करणार्या सर्व एंजन्सिची चौकशी कुठपर्यंत आली याची माहिती घेतली आहे. ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यात झाली आहे त्यामुळे या घटनेची लवलकारात लवकर चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय प्रशासन प्रयत्नशिल आहे. आता या घटनेची अधिक खोलात चौकशी व्हावी यासाठी संसदीय समीतीसुद्धा अहमदाबादला भेट देण्याची शक्यता आहे.
या विमानांची खरेदी युपीए सरकारच्या काळात झाली होती २००८ मध्ये ही विमाने भारताला मिळणार होती पण यांच्या निर्मितीला वेळ लागल्याने २०१४ मध्ये ती भारताच्या ताब्यात मिळाली. ही विमाने जेव्हा घेतली तेव्हा ‘एअर इंडिया’ सरकारच्या ताब्यात होती. २०२२ मध्ये या कंपनीला टाटा ग्रुपने घेतले आहे. बोइंग ७८७-८ या विमांनाच्या खरेदीचा व्यवहार हा काँगेस आघाडीच्या युपीए काळात झाल्याने आता या दुर्घटनेमुळे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. ज्यावेळी हा खरेदी व्यवहार झाला त्यावेळी यावर बरीच टीकाटिपण्णी व चर्चा झाली होती.
या घटनेवर पंतप्रधान कार्यालय जातिने लक्ष ठेऊन आहे. पंतप्रधानांचे सचिव पीके मिश्रा यांनी जातीने हजर राहून एक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो, एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया या एजन्सिच्या अधिकाऱ्यांशी बोलून या विमान दुर्घटने बाबत माहिती घेतली. पंतप्रधान मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत तरी बोईंग ७८७-८ या विमान दुर्घटनेकडे त्यांचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत अपडेट माहिती घेण्यास सांगितले आहे. त्याबरोबर पीएमओ या घटनेच्याबाबतीय ज्यापद्धतीने सक्रियता दाखवत आहे. त्याचा विचार करता या दुर्घटनेचे नेमके कारण लवकरात लवकर पुढे येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे यापुढे अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करता येतील.
जडीयूचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा सदस्य संजय झा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती या घटनेची चौकशी करत आहे. ही विमान दुर्घटना कशी झाली व यापुढे या घटना टाळायच्या असतिल तर काय करता येईल याबाबतीत ही समिती अभ्यास करत आहे. ही समिती डीजीसीए, एअर इंडिया व बोइंग कंपनीशीही बोलणी करणार आहे. विमानांची खरेदी निर्णय, सुरक्षा उपाय, विमानांची देखभाल याबाबतीतही ही समिती माहिती घेऊन विश्लेषण करणार आहे. विषेशता बोइंग ७८७-८ या विमानांच्या बाबतीत अधिक खोलात चौकशी करेल यामध्ये याच विमानांची का खरेदी करण्यात आली याच्या स्पर्धेतील विमानांना डावलून यावरच का शिक्कामोर्तब केले ही माहिती उजेडात येईल.