

Ahmedabad Plane Crash civil aviation minister Kinjarapu Rammohan Naidu
नवी दिल्ली/अहमदाबाद : अहमदाबादमध्ये गुरुवारी झालेल्या एअर इंडिया विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला असून त्याचे डिकोडिंग सध्या सुरू आहे. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय समित्या सखोल चौकशी करत आहेत.
मंत्री राम मोहन नायडू म्हणाले, "या दुर्घटनेनंतर एअर इंडिया कंपनीच्या बोईंग 787 ड्रीमलायनर ताफ्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. भारतात सध्या असलेल्या 34 ड्रीमलायनर विमानांपैकी आठची आधीच तपासणी झाली आहे. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने तत्काळ घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.
तांत्रिक तपास करणाऱ्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घटनास्थळी ब्लॅक बॉक्स हस्तगत केला आहे. या ब्लॅक बॉक्सचे डिकोडिंग केल्यावर अपघाताच्या क्षणी किंवा अपघात होण्याआधी नक्की काय घडले होते याचा सखोल तपशील समोर येईल. आम्ही सुद्धा AAIB कडून होणाऱ्या संपूर्ण चौकशीचा अहवाल आणि निष्कर्ष काय असतो याची आतुरतेने प्रतीक्षा करत आहोत."
मंत्री राम मोहन नायडू म्हणाले, "हा अपघात केवळ विमान कंपन्यांपुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण देशासाठी एक धक्का आहे. मी स्वतः माझ्या वडिलांना अपघातात गमावले आहे, त्यामुळे अशा दु:खाची कल्पना मला आहे. माझ्या सर्व सहवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत."
ते पुढे म्हणाले, "महत्त्वाचं म्हणजे या अपघातापूर्वी, हेच विमान पॅरिस-दिल्ली-अहमदाबाद हे संपूर्ण मार्ग सुरक्षितपणे पार करून आले होते. कोणतीही अडचण आली नव्हती."
सिन्हा यांनी स्पष्ट केलं की, "या अपघातानंतर एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनर ताफ्याची सखोल तपासणी सुरू झाली आहे. भारतात सध्या अशा 34 विमाने आहेत, त्यापैकी 8 विमानांची आधीच तपासणी झाली आहे."
दुपारी 1.39 वाजता, विमानाने उड्डाण केल्यानंतर 650 फूट उंची गाठली.
याच दरम्यान, वैमानिकाने “Mayday” (आपत्कालीन मदत) कॉल एटीसीला दिला.
त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही.
नक्की एक मिनिटातच, विमान विमानतळापासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या मेघाणी नगर येथील मेडिकल होस्टेल कॉम्प्लेक्सवर कोसळले.
या अपघातात फक्त विमानातील प्रवासीच नव्हे, तर होस्टेलमध्ये असलेल्या 20 हून अधिक जणांचा देखील मृत्यू झाला आहे.
विमानात एकूण 242 प्रवासी आणि कर्मचारी होते, त्यामध्ये:
169 भारतीय नागरिक
53 ब्रिटिश
1 कॅनेडियन
7 पोर्तुगीज नागरिक
12२ क्रू मेंबर्स