Adani Solar Project pudhari photo
राष्ट्रीय

Adani Solar Project: पॅरिसपेक्षा पाचपट मोठा.. चंद्रावरूनही दिसणार अदानींचा 'हा' प्रोजेक्ट; प्रणव अदानींचा पहिल्याच मुलाखतीत धमाका

प्रणव अदानी हे अदानी इंटरप्राईजेस लिमिटेडचे डायरेक्टर आहेत. त्यांनी कंपनीच्या भविष्यातील काही प्रोजेक्टबद्दल देखील माहिती दिली.

Anirudha Sankpal

  • प्रणव अदानींनी दिली महत्वकांक्षी प्रोजेक्ट्सची माहिती

  • पॅरिसपेक्षाही पाच पट क्षेत्रफळावर प्रोजेक्ट

  • पुढच्या वर्षीचा नाही तर दोन दशकांपुढचा विचार

Adani Solar Projectpranav adani interview: भारताच्या बड्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक घराणं म्हणजे अदानी घराणं. देशात अन् परदेशात त्यांचे अनेक महत्वकांक्षी प्रॉजेक्ट सुरू आहेत. मात्र अदानी परिवारातील उद्योजक लोकं माध्यमांमध्ये फार कमी दिसतात. आता आता कुठे गौतम अदानी हे माध्यमांना प्रतिक्रिया अन् मुलाखती देताना दिसत आहेत. आता त्यांचा मुलगा प्रणव अदानीने देखील माध्यमांना एक दीर्घ मुलाखत दिली.

प्रणव अदानी हे अदानी इंटरप्राईजेस लिमिटेडचे डायरेक्टर आहेत. त्यांनी कंपनीच्या भविष्यातील काही प्रोजेक्टबद्दल देखील माहिती दिली. अदानी ग्रुपने पोर्ट अन् एअरपोर्ट पासून धारावी रीडेव्हलपमेंट प्रोजेक्टसोबतच पुढच्या पाच वर्षात कंपनी कोणकोणते प्रोजेक्ट हातात घेणार याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी आपल्या पित्याचा म्हणजे गौतम अदानींच्या मंत्राचा पुनरूच्चार केला. त्यांनी मोठं घडवा, धैर्यानं बनवा अन् पुढच्या पिढीसाठी बनवा या मंत्राचा पुनरूच्चार केला.

प्रणव अदानींनी दिली महत्वकांक्षी प्रोजेक्ट्सची माहिती

अजेंडा आज तक या कार्यक्रमात बोलताना प्रणव अदानी यांनी क्लीन एनर्जी विभागात अदानी ग्रुप काही महत्वकांक्षी प्रोजेक्ट्स हाती घेणार असल्याचं सांगितलं. त्यांनी आमच्या प्रोजेक्टचा विस्तार एवढा मोठा असेल करी तो चंद्रावरून देखील सहज पाहता येईल.

प्रणव अदानी यांनी त्यांची कंपनी गुजरातमधील कच्छमध्ये जगातील सर्वात मोठा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट उभारणार असल्याचं सांगितलं. हा प्रोजेक्ट फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या क्षेत्रफळापेक्षा पाचपट मोठा असणार आहे. ते म्हणाले, 'जर रिन्युएबल एनर्जीबाबत बोलायचं झालं तर अदानी ग्रुप यामध्ये सर्वात मोठी भूमिका निभावणार आहे. आम्ही २०३० पर्यंत जगातील सर्वात मोठी रिन्युएबल एनर्जी तयार कऱणारी कंपनी बनणार आहोत.'

पॅरिसपेक्षाही पाच पट क्षेत्रफळावर प्रोजेक्ट

प्रणव अदानी पुढे म्हणाले, 'गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात खावडा बॉर्डरजवळ अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड ३० गीगावॅट म्हणजे जवळपास ३००० मेगावॅट एकाच ठिकाणी उर्जा निर्मिती करणारा प्रोजेक्ट उभारणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जवळपास आमचा प्रोजेक्ट हा ५२० किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेला असेल. याचा आकार पॅरिसपेक्षा ५ पट असेल अन् हा प्रोजेक्ट चंद्रावरून देखील सहत पाहता येईल. आम्ही ही ऊर्जा सोलार पॉवर द्वारे निर्माण करणार आहोत. अदानी ग्रीन सर्व प्रोजेक्ट्स मिळून २०३० पर्यंत जवळपास ५० गीगावॅट सोलार एनर्जी निर्माण करणार आहे.'

पुढच्या वर्षीचा नाही तर दोन दशकांपुढचा विचार

प्रणव अदानी यांनी कच्छ मधील खावडा भागात वाळवंटी जमीन अन् प्रचंड उष्णता असल्यानं सुरूवीताला कोणी काम करायला तयार नव्हतं. अशा पडीक जमिनीतून देखील आम्ही उत्पन्न निर्माण करण्याचे एक मोठे काम करत आहोत. प्रत्येक व्यवसायात सप्लाय चेन आणि इतर समस्या येतात. आता आम्ही या समस्या आयुष्याचा एक भाग मानतो अन् पुढे जातो.

प्रणव अदानी यांनी भारताला २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात पायभूत उद्योग क्षेत्र मोठी भूमिका निभावणार असल्याचं सांगितलं. अदानी ग्रुप हे फक्त २०२६ साठी योजना तयार करत नाही तर दोन दशके पुढचा विचार करते असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT