Sharad Pawar Dinner: शरद पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसी... अदानींसह राहुल-प्रियांका यांच्या हजेरीने भुवया उंचावल्या
डिनर पार्टीला विविध क्षेत्रातील मान्यवर
राहुल यांच्यासह गौतम अदानींचीही उपस्थिती
अजित पवारही डिनर डिप्लोमसीत सामील
Sharad Pawar Dinner Diplomacy: राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलंच गरम होत आहे. बुधवारी लोकसभेत वोट चोरीवरून सत्ताधारी अन् विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी झाल्यानंतर रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी डिनर आयोजित करण्यात आला होता. या डिनरसाठी देशातील अनेक उद्योगपती आणि राजकीय व्यक्ती देखील उपस्थित होते. शरद पवार यांच्या ८५ व्या जन्मदिनाच्या आदल्या दिवशी हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं.
डिनर पार्टीला विविध क्षेत्रातील मान्यवर
शरद पवार हे देशातील दिग्गज राजकारण्यांपैकी एक समजले जातात. त्यांच्या डिनर पार्टीला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवारांनी हजेरी लावली होती. यात लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी तसेच प्रियांका गांधी यांनी देखील उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे या डिनर पार्टीला प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी देखील उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार अन् खुमासदार चर्चा रंगली.
राहुल यांच्यासह गौतम अदानींचीही उपस्थिती
राजकारण आणि उद्योग जगत यांची उठबस सर्वश्रुत आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी वढेरा अन् गौतम अदानी यांच्याशिवाय शरद पवारांच्या घरी आयोजित या डीनर पार्टीला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी देखील सहभागी झाले होते. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या स्नेहभोजनाला उपस्थित होते.
अजित पवारही डिनर डिप्लोमसीत सामील
यावरून राज्यात कितीही राजकीय मतभेद असले तरी अजित पवार आणि शरद पवार हे घराच्या चौकटीच्या आत एकत्रच दिसतात. शरद पवार हे गेल्या सहा दशकापासून राजकीय जीवनात सक्रीय आहेत. त्यांचे सर्व पक्षात मित्र आहेत. त्यांची एक कसलेला राजकारणी म्हणून देखील ओळख आहे.

