हर्षवर्धननं मित्रामार्फत कॉल केला अन्....
कुटुंबियांना मुलीचं अपहरण झाल्याचं सांगितलं
Actress Kidnapped: मालिका आणि चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा तिच्या पतीनेच अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कर्नाटकमधील बंगळुरू इथं घडली. याबाबत लीला आर यांनी तक्रार दाखल केली आहे. लीला आर या अभिनेत्री चैत्रा आर यांची बहीण आहेत.
चैत्रा आर यांनी वैवाहिक जीवनातील मतभेदानंतर आपल्या पतीपासून वेगळी राहण्याचा निर्णय घेतला होता. त्या गेल्या आठ महिन्यांपासून आपल्या पतीपासून वेगळ्या राहत आहेत. अभिनेत्री चैत्रा यांचा पती हर्षवर्धन हा हसन भागात राहतो. तर चैत्रा या मागदी रोड इथं घर रेंटवर घेतलं आहे. या दोघांनाही एका वर्षाची मुलगी आहे. या दोघांचे २०२३ मध्ये लग्न झालं होतं.
चैत्र आणि हर्षवर्धन हे वेगळे राहू लागल्यानंतर चैत्राने अभिनयाचं काम पुन्हा सुरू केलं. ७ डिसेंबर रोजी तिनं तिच्या कुटुंबियांना ती मैसूरला शूटिंगसाठी जाणार म्हणून सांगितलं होतं. मात्र हा चैत्राच्या प्लॅनचा एक भाग असल्याचा आरोप चैत्राच्या कुटुंबियांनी केला आहे.
हर्षवर्धनने त्याचा सहकारी कौशिकला २० हजार रूपये अॅडव्हान्स दिला होता. त्यानेच चैत्राला कॉल करून मैसूर रोज मेट्रो स्टेशन इथं सकाळी ८ वाजता येण्यास सांगितले होते. त्यानंतर चैत्राला बळजबरीने कारमधून नाईस रोड आणि बिदादी रोडवर नेण्यात आलं.
दरम्यान, सकाळी १०.३० ला चैत्राला संधी मिळताच तिनं तिचा मिक्ष गिरीषला याबाबतची माहिती दिली. त्यानं त्वरित कुटुंबियांना चैत्राचे अपहरण करण्यात आल्याचे कळवले.
संध्याकाळी हर्षवर्धनने चैत्राच्या आईला सिद्धाम्मा यांना फोन केला. त्यानंतर त्यानं आपण तुमच्या मुलीचं अपहरण केल्याचे मान्य केलं आणि त्यानंतर त्यानं चैत्राच्या आईला सांगितलेल्या ठिकाणी त्याचा मुलीला घेऊन येण्यास सांगितलं. जोपर्यंत मुलीला घेऊन येणार नाही तोपर्यंत तुमच्या मुलीला चैत्राला सोडणार नाही असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.
चैत्राचे कुटुंबीय सुरूवातीला तिपतूर आणि बंगळुरू इथं शोध घेत होते. नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. चैत्राच्या बहिणीनं केलेल्या तक्रारीच्या आधारावर हर्षवर्धनविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी हर्षवर्धन हा वर्धन एन्टरप्राईजेसचा मालक असून तो चित्रपट निर्माता देखील आहे.