Abhijeet Dipka CJP Protest: सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांचे उपोषण मागे घेतले. त्यांनी आपली धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सोडून दिल्याचे संकेत मिळत आहेत. त्यानंतर कॉक्रोज जनता पार्टीने आपलं आदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आम्ही धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार व्यक्त केला.
अभिजीत दिपके म्हणाले की, 'आम्ही आज चर्चा करणार आहो. आम्ही म्हटलं घरी येणार नाही. पण चर्चेत फक्त राजीनाच असेल राजीनामा सोडून आम्ही कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करणार नाही. आपल्या काही लोकांना अटक करण्याचे षडयंत्र रचलं जात आहे.'
दिपके पुढे म्हणाले की, 'आपल्यातील काही लोकांना अट करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. आता पुन्हा सरकारने चूक केली तर आंदोलन मोठं करणार, आम्हाला अटक झाली तर शांततेत आंदोलन करा. देशाचं नुकसान करू नका. जे लोक हिंसाचार करतील ते कॉक्रोज जतना पक्षाचे नसतील असं देखील स्पष्ट केलं.
अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही असं देखील स्पष्ट शब्दात सांगितलं.
अभिजीत दिपके जंतर मंतरवरून बोलताना म्हणाले की, २० जुलै रोजी पोलिसांनी शेकडो मुलांची डोकी फोडली आहे. सोनम सरांना २६ दिवसांपर्यंत उपोषण करावं लागलं. त्यामुळं आता राजीनाम्याच्या खाली काहीही नाही. आम्ही इथून राजीनामा घेऊनच जाणार असं देखील दिपके म्हणाले.'
अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. राजीनामा देत नाही तोपर्यंत रोज धरना होणार अशी घोषणा देखील स्टेजवरून दिली.